• January 11, 2025
  • No Comment

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, आता मुलाने पतंग उडवला तर आईबाप जाणार तुरुंगात

पुणे पोलिसांचा मोठा निर्णय, आता मुलाने पतंग उडवला तर आईबाप जाणार तुरुंगात

पुणे: मकरसंक्रांत जसजशी जवळ येत आहे, तसतशी पतंग, मांजा विक्री दुकानांवर गर्दी वाढू लागली आहे. कायद्याने बंदी असलेला जीवघेणा नायलॉन मांजा चोरट्या मार्गाने विक्री केला जात आहे.

त्यामुळेच महापालिका तसेच पोलीस प्रशासनाकडून सातत्याने अवैधरित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्हाभरात कारवाई सुरूच आहे. महापालिका आणि स्थानिक पोलिसांकडून मागील १५ दिवसात अनेक ठिकाणी कारवाया केल्या असून लाखो रुपयांचा नायलॉन मांजा जप्त केला आहे. तरीही रस्त्यावर अनेक ठिकाणी नायलॉन मांजाचा वापर करत पंतग उडवल्याचं उघडकीस आलं आहे.

पुण्यात तीन दिवसांपूर्वी नायलॉन मांजा गळ्यात अडकून गळा कापल्याने एका तरूणाला ३२ टाके पडलेत. तर कात्रजचे रहिवासी असलेले सतीश फुलारी हे १५ दिवसांपूर्वी मुलीला शाळेतून घेऊन दुपारी घरी परत चालले होते. दरम्यान, कात्रज-कोंढवा रस्त्यावर नायलॉन मांज्याने गळ्याला विळखा घातल्याने त्यांचा गळा चिरला. त्यांना तब्बल १५ टाके पडले. दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचलाय. नायलॉन मांजामुळे होणारे अपघात पाहता, पुणे पोलीस अॅक्शन मोडमध्ये आली आहे.

आता अल्पवयीन मुलं नायलॉन मांजा वापरून पतंग उडवताना आढळून आली. त्यांच्या आई वडिलांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली जाणार आहे. पुणे पोलिसांनी याबाबतचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मकर संक्रांतीत आपलं मूल पतंग उडवत असेल तर तो त्यासाठी कोणता दोरा वापरतो, यावर पालकांना लक्ष ठेवावं लागणार आहे. तसं न केल्यास थेट आई वडिलांवर गुन्हे दाखल होणार आहेत. यामुळे आई वडिलांना तुरुंगात जाण्याची वेळही येऊ शकते, असं पुणे पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

खरं तर, महाराष्ट्रात देशात अनेक ठिकाणी नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आली आहे. तरीही अनेक ठिकाणी नायलॉन मांजाची छुप्या पद्धतीने सर्रास विक्री होत असल्याचं समोर येत आहे. मांजामुळे गळा कापून अनेकांना आयुष्यभराची दुखापत होत आहे. हे सगळे अपघात पाहता आता पालकांवर जबाबदारी निश्चित करण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतला आहे. गुन्हे शाखेच्या उपायुक्तांनी याबाबतची पोलिसांची भूमिका जाहीर केली आहे.

Related post

चरस, गांजाची विक्री करणारा टोळका जेरबंद, अंमली पदार्थ विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी, चव्वेचाळीस लाखाचा माल हस्तगत

चरस, गांजाची विक्री करणारा टोळका जेरबंद, अंमली पदार्थ विरोधी…

पुणे : कात्रज परिसरातून चरस, गांजाचा मोठा साठा जप्त; अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या अरुण अरोराकडून 44 लाखाचा माल हस्तगत कात्रज: अंमली…
फरार अट्टल गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई,वारजे माळवाडी पोलिसांची लोणावळ्यात कारवाई

फरार अट्टल गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई,वारजे माळवाडी…

वारजे: जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी सह साथीदारांवर मोक्का कारवाई केली. त्यातून तो जामीनावर सुटल्यानंतरही त्याची गुन्हेगारी थांबत…
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अजुन अस्पष्ट

पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अजुन अस्पष्ट

भोसरी: पिंपरी-चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी परिसरात प्लास्टिक आणि रबर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *