- January 11, 2025
- No Comment
गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणारे दोन टोळके जेरबंद
पिंपरी: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी पुणे व जालना येथून अटक केली.
शुभम सोरटे (रा. नांदेड सिटी, पुणे) व आदित्य इंगळे (रा.जय भवानी नगर, म्हाडा रोड, भोकरदन, जि. जालना) अशी अटक आरोपींची नावे आहेत.
ब्लॉक ट्रेडिंग आणि आयपीओ ट्रेडींगमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास प्रत्येक दिवसाला १० ते १२ टक्के नफा होईल, असे आमिष दाखवून चिंचवड येथील एकाला ७६ लाख १९ हजार ७०० रुपयांची गुंतवणूक करायला लावली. मात्र, नंतर कोणत्याही प्रकारे परतावा न देता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्यासाठी वापरलेल्या बँक खात्यापैकी दोन बँक खाते हे पुण्यातील नांदेड सिटी येथील असल्याची माहिती मिळाली. सोरटे याला ताब्यात घेत त्याच्याकडे तपास केला असता, त्याने हा गुन्हा आदित्य इंगळे याच्यासोबत केल्याचे सांगितले. त्यानंतर इंगळे याला भोकरदन येथून ताब्यात घेतले.