• January 11, 2025
  • No Comment

जप्त केलेली वाहने ताब्यात घ्या, वाहन मालकांना पाठवली नोटीस

जप्त केलेली वाहने ताब्यात घ्या, वाहन मालकांना पाठवली नोटीस

    पुणे: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या सी विभाग कार्यालयाकडून दारुबंदी कायद्यांतर्गत जप्त केलेल्या वाहनाच्या वाहन मालकांनी वाहनाच्या मूळ कागदपत्रांसह कार्यालयाशी प्रत्यक्ष संपर्क साधावा आणि वाहने ताब्यात घेण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन वाहने ताब्यात घ्यावीत, असे आवाहन निरीक्षक संदीप कदम यांनी केले आहे.

    दारुबंदी कायद्यांतर्गत नोंदविलेल्या गुन्ह्यातील जप्त वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यात येत असून याकरीता उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाकडून मूळ मालकांना वाहन ताब्यात घेण्याकरीता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्याबाबत नोटीस बजावण्यात आली आहे. तथापि, ज्या वाहन मालकांना अशा प्रकारची नोटीस मिळाली नसेल त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा. जप्त वाहनाच्या क्रमांकाची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे, अशी माहिती श्री. कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

    Related post

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…
    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    अप्पर तहसील लोणी काळभोर येथे नागरिकांच्या आंदोलन.

    पुणे: कदमवाकवस्ती गावामध्ये पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. यासंदर्भात संबंधित प्रशासनाकडून नुकसानग्रस्तांचा पंचनामा देखील करण्यात आला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *