- January 11, 2025
- No Comment
अल्पवयीन मुलीचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे आवाहन
पुणे: लोहियानगर मधील एक अल्पवयीन तरुणी बेपत्ता असून तिचा शोध लावण्यासाठी पोलीस प्रयत्नशील आहेत. या मुलीची आई सुषमा रविंद्र कुचेकर वय ३८ वर्षे, धंदा गृहिणी, रा. गल्ली नं. ०३.५४ एफपी १६८ लोहियानगर, पुणे यांनी याबाबत फिर्याद नोंदविली आहे.
फिर्यादी यांची मुलगी नामे श्रावणी रविंद्र कुचेकर, वय १७/०५/२००७(१७ वर्षे, ०७ महीने, १७ दिवस) रा सदर हीस दि. ०२/०१/२०२४ रोजी सकाळी १०/०० वा.चे सु. गल्ली नं. ०३.५४ एफपी १६८ लोहियानगर, पुणे येथुन कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणाकरीता फुस लावून पळवून नेली आहे.
अश्विनी हिरे, पोलीस उप-निरीक्षक, खडक पोलीस स्टेशन पुणे यांनी आज प्रसार मध्यामंना कळविले आहे कि,’ लोहिया नगर मधून अपहृत मुलीचा वर्तमान पत्रात फोटो प्रसारित करावा या नुसार खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत खडक पोलीस ठाणे, गुन्हा रजि. नं. ०९/२०२५ कलम भा.न्या.सं कलम १३७ (२)ची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात आली आहे.
या मुलीचे वर्णन: नाव श्रावणी रविंद्र कुचेकर, वय १७/०५/२००७ (१७ वर्षे, ०७ महीने, १७ दिवस) रा. गल्ली नं.०३ ५४/एफपी १६८ लोहियानगर, पुणे बांधा मध्यम, उंची ४ फुट ५ इंच, रंगाने सावळी, चेहरा उभट, केस लांब काळे, पोषाख जांभळ्या रंगाचा टॉप व काळ्या रंगाची लेगीन्स कानात काळे टॉप, बोली भाषा मराठी, हिंदी, इंग्रजी, पायात काही नाही, सोबत वनप्लस कंपनीचा मोबाईल त्यामध्ये सिमकार्ड नाही असुन मौल्यवान चिजवस्तु पैसे नाही.