• January 11, 2025
  • No Comment

वडगावात गरजू महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पिंक रिक्षा योजनेबाबत जनजागृती, असा करा अर्ज

वडगावात गरजू महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पिंक रिक्षा योजनेबाबत जनजागृती, असा करा अर्ज

पिंपरी: महाराष्ट्र शासनाने गरजू महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पिंक (गुलाबी) ई-रिक्षा योजना लागू केली आहे. वडगाव शहरातील महिलांना रोजगार निर्मितीसाठी पिंक (गुलाबी) रिक्षाचे स्वागत व जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन कुलस्वामिनी महिला मंचच्या अध्यक्षा सारिका शेळके, मोरया प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली मयूर ढोरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.

यावेळी बालकल्याण प्रकल्प अधिकारी संध्या नगरकर, पर्यवेक्षिका संगीता ठाकूर, कांचन ढोरे, प्रतिभा ढोरे, कल्पना ढोरे, हर्षा ओव्हाळ, चेतना ढोरे, अर्चना ढोरे, छाया धोंगडे, कमल शिंदे, सुमिता ढवळे, शालन कावडे, शकुंतला नागे, मंदा चव्हाण उपस्थित होत्या.

वडगाव शहरातील २० ते ४० वयोगटातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी पिंक रिक्षा घेण्यासंदर्भात मोरया प्रतिष्ठान जनसंपर्क कार्यालयात योजनेचे अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच बँकेमार्फत अर्थसहाय्य मिळवून देण्यासाठी सहकार्य करण्यात येणार आहे. यासह येणाऱ्या काळात महिला रिक्षा व्यवसायासाठी स्वतंत्र रिक्षा स्टॅन्ड सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अबोली ढोरे यांनी सांगितले.

 

योजनेसाठी आवश्यक पात्रता

 

१. अर्जदार महाराष्ट्राची रहिवाशी व वय २० ते ४० वर्षे दरम्यान असावे

२. अर्जदाराचे स्वतःचे बँक खाते असावे

३. अर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ३ लाखापेक्षा अधिक नसावे

४. विधवा, घटस्फोटीत, निराधार महिलांना प्राधान्य

५. दारिद्र्य रेषेखालील महिलांना देखील प्राधान्य

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

१. अर्जदाराचे आधार, पॅनकार्ड व महाराष्ट्राचे अधिवास प्रमाणपत्र

२. कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला किंवा पिवळे/ केसरी रेशनकार्ड

३. स्वतःचे बॅंक खाते पासबुक व पासपोर्ट आकाराचे फोटो

४. अर्जदार महिला स्वतः रिक्षा चालविणार असल्याचे हमीपत्र

५. अर्जदार योजनेच्या अटीशर्तीचे पालन करणार असल्याचे हमीपत्र

६. अर्जदार कर्जबाजारी नसल्याचे हमीपत्र.

Related post

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…
रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे फरार असलेल्या गुंडाला खंडणी विरोधी पथकाने केले जेरबंद

रवी जाधव टोळीवर मोक्का कारवाई झालेल्या गुन्ह्यात सव्वा वर्षे…

पुणे : वारजे माळवाडी येथील चंद्रलोक बियर बारमध्ये रवी जाधव टोळीने तोडफोड करुन विरोधी टोळीतील दोघांना बेशुद्ध होईपर्यंत कोयत्याने वार करुन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *