बेकायदेशीर नायलॉन मांजा चोरुन विक्री; गुन्हेगारास सहकारनगर पोलिसांनी केल जेरबंद

    बेकायदेशीर नायलॉन मांजा चोरुन विक्री; गुन्हेगारास सहकारनगर पोलिसांनी केल जेरबंद

    धनकवडी: धोकादायक नायलाॅन मांजाच्या विक्रीवर बंदी घालण्यात आली असून नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या विरुद्ध पोलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकाने एका तरुणाला ताब्यात घेतले आहे.

    त्याच्याकडून शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजाचे १८ हजार किंमतीचे ३० रिळ मिळून आल्याने त्यास मुद्देमालासह ताब्यात घेत त्याचेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    राहुल शाम कांबळे (वय १९ वर्षे रा. सुखसागर नगर, बनकर शाळेच्या पाठीमागे, तुळजाभवानी मंदिराशेजारी,) असे ताब्यात घेतलेल्या तरुणाचे नाव आहे. सहकारनगर पोलीस ठाणे हद्दित तपास पथकातील अधिकारी व अंमलदार हद्दित गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग करीत असताना पोलीस अंमलदार महेश मंडलिक यांना त्यांचे बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, के. के. मार्केट, सी.एन.जी. पेट्रोलपंपा जवळ एक इसम पतंगा साठी लागणारा व शासनाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजा विक्री करत आहे. खात्रीपूर्वक माहिती मिळताच तपास पथकाने घटनास्थळी धाव घेत छापा कारवाई केली असता, राहुल कांबळे पतंग उडवण्यासाठी लागणारा व शासणाने प्रतिबंधीत केलेला नायलॉन मांजासह ताब्यात घेतले.

    सदरची कामगीरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक छगन कापसे, यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर तपास पथकाचे अधिकारी सहा पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहा पो. फौजदार बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, किरण कांबळे, बजरंग पवार, चंद्रकांत जाधव, महेश मंडलिक, अमित पदमाळे, सागर सुतकर, महेश भगत, अभिजीत वालगुडे, खंडु शिंदे यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *