अवैधपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोन आरोपी अटक; जूनी सांघवीतील घटना  

    अवैधपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोन आरोपी अटक; जूनी सांघवीतील घटना  

    पिंपरी: अवैधपणे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ही कारवाई सांगवी आणि बावधन येथे करण्यात आली आहे.

    रोहित दुर्गेश धर्माधिकारी (वय २३, रा.प्रियदर्शनीनगर, जुनी सांगवी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस अंमलदार प्रवीण पाटील यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुनी सांगवी येथील गणपती विसर्जन घाटावर रोहित पिस्तूल घेऊन आला असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून रोहितला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे पिस्तूल व दोन हजार रुपयांचे एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.

    तर दुसऱ्या कारवाईत केशव त्रिंबक काळे (वय २४, रा. हिवरे, भोजेवाडीता, जि. बीड) याला अटक करण्यात आली आहे. पोलीस नाईक तौसिफ महात यांनी बावधन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी केशवला ताब्यात घेऊन त्याच्याकडून ५० हजार रुपयांचे पिस्तूल, एक जिवंत काडतूस, पाच लाख रुपयांची एक मोटार, ९० हजारांची रोकड असा सहा लाख ४५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *