आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर मोठी कारवाई

    आयपीएस सत्यसाई कार्तिक यांची मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर मोठी कारवाई

    लोणावळा: लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट आदींकरिता प्रशासनाने वेळेचे बंधन घालून दिलेले आहे.

    असे असतानाही काही आस्थापना चालक त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष करत असल्याबाबतची माहिती सत्यसाई कार्तिक यांना प्राप्त झाली होती.

    त्यानुसार सत्यसाई कार्तिक यांनी शुक्रवारी (दि. १० जानेवारी) रोजी लोणावळा उपविभागात मध्यरात्री केलेल्या कारवाईत कामशेत येथील दीपा बार अँड रेस्टॉरंट व वडगाव मावळ मधील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट अशा दोन ठिकाणी पोलीस पथकाने टाकलेल्या छाप्यामध्ये वरील बार रेस्टॉरंट चालक हे विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी त्यांचे बारमध्ये ग्राहकांना खाद्यपदार्थ, दारू ई.ची विक्री करताना आढळून आले.

    तसेच वाद्य,ऑर्केस्ट्रा चालू ठेवलेला असताना मिळुन आल्याने नमूद दोन्ही बार चालकांवर भारतीय न्याय संहिता चे कलम 223 व महाराष्ट्र पोलीस अधिनियम चे कलम 33 (डब्ल्यू) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास कामशेत पोलीस व वडगाव मावळ पोलीस हे करत आहेत.

    सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणावळा उपविभागाचे सहा. पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी त्यांच्या पथकासह केली आहे.

    Related post

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची देणगी

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची…

    भीमनगर येथील गो-हे खुर्द येथे समाज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी घटना घडली आहे. स्थानिक उद्योजक मा. श्री. कालिदास (दादा)…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *