• January 12, 2025
  • No Comment

पैशांच्या वादातून तरुणाचा खून, आरोपी गजाआड

पैशांच्या वादातून तरुणाचा खून, आरोपी गजाआड

    पुणे: पुण्यातून एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. हातउसने दिलेल्या पैशांच्या वादातून तरुणाला बेदम मारहाण करून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ५ जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास नवी पेठेतील राजेंद्रनगर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या (एसआरए) वसाहतीत घडली आहे.

    आनंद परमेश्वर डोलारे (वय-३०, रा. एसआरए वसाहत, राजेंद्रनगर, नवी पेठ) असे खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

    या प्रकरणी आनंद डोलारेची आई वनिता (वय-५७) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून विश्रामबाग पोलिसांनी मन्या साेनावणे

    (रा. राजेंद्रनगर) याला अटक करण्यात आली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आनंद याला खूप दारुचे व्यसन आहे. रविवारी रात्री तो नेहमीप्रमाणे कामावरुन घरी आला. दारु पिऊन तो वसाहतीच्या परिसरात थांबलेला होता. त्यावेळी आरोपी मन्या याने आनंदला हातउसने पैसे दिले होते. त्याने आरोपीने दिलेले पैसे परत केले नव्हते. त्यामुळे तो त्याच्यावर खूप चिडला होता. पैशांवरून दोघांमध्ये वाद झाला.

    दरम्यान, पैशे परत न केल्याचा राग मनात धरून आरोपीने त्याला दांडक्याने बेदम मारहाण केली. तसेच आनंदला उचलून जमिनीवर आपटल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या आनंदला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. खूनाचा गुन्हा दाखल करून आरोपी मन्याला अटक करण्यात आली आहे.

    पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप खाडे करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *