• January 12, 2025
  • No Comment

मुळशीत पर्यटकांना लुटणाऱ्या दोन आरोपी जेरबंद, सात वर्षांचा कारावास

मुळशीत पर्यटकांना लुटणाऱ्या दोन आरोपी जेरबंद, सात वर्षांचा कारावास

मुळशी: मुळशी धरण परिसरात फिरायला आलेल्या मित्र-मैत्रिणींसह स्थानिक महिलेला मारहाण करून त्यांच्याकडील ऐवज व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी न्यायालयाने दोन आरोपींना सात वर्षे कारावासाची शिक्षा व प्रत्येकी पाच लाख रुपयांचा दंड व दंड न भरल्यास एक वर्ष साधा कारावास, अशी शिक्षा सुनावली आहे.

डिसेंबर २०१७ मध्ये घडलेल्या या गुन्ह्याबद्दल सात वर्षांनंतर पुणे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश (विशेष मोक्का न्यायाधीश) पी. पी. जाधव यांनी हे आदेश दिले आहेत.

भगवान बाबू मरगळे (वय २३, रा. सुतारदरा, कोथरूड, पुणे, मूळ रा. वातुंडे, ता. मुळशी, जि. पुणे) व लाल्या ऊर्फ प्रकाश शांताराम येवले (वय १९, रा. सुतारदरा, कोथरूड, पुणे) अशी शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत कुणाल विजय झवेरी (वय-३०, रा. एनआयबीएम रस्ता, पुणे, मूळ रा. चिकूवाडी रस्ता, मालाड पूर्व, मुंबई) यांनी २२ डिसेंबर २०१७ ला पौड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुणाल झवेरी हे २२ डिसेंबर २०१७ ला मैत्रिणीसह मुळशी धरण परिसरात फिरायला गेले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास मरगळे व येवले यांनी झवेरी यांना मारहाण करून त्यांच्याकडील तीन मोबाईल, पाकीट, चांदीची साखळी जबरदस्तीने काढून घेतली. त्याच दिवशी मुळशी खुर्द येथील रहिवासी विनूबाई शिवराम कानगुडे यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र व कर्णफुले, मोबाईल काढून नेला होता. त्या वेळी तेथील काही लोकांनी एकाला पकडून पौड पोलिस ठाण्यात आणले होते. कुणाल झवेरी व विनूबाई कानगुडे यांच्याकडील सुमारे ९० हजार रुपये किमतीचा ऐवज आरोपींनी लुटला होता. हा गुन्हा सिद्ध झाल्याने दोघांना शिक्षा सुनावण्यात आली आहे.

या गुन्ह्याचा तपास सेवानिवृत्त उपविभागीय पोलिस अधिकारी गणपतराव माडगूळकर, पौडचे तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे, सरकारी वकील मोका अॅक्ट सी. एस. साळवी यांनी केला होता. जिल्हा कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलिस निरीक्षक संतोष घोळवे, शिवाजीनगर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून विद्याधर निचित, कोर्ट कर्मचारी म्हणून पोलिस हवालदार ए. ए. हवालदार तर समन्सचे कामकाज पोलिस जवान अकबर शेख यांनी पाहिले.

Related post

चरस, गांजाची विक्री करणारा टोळका जेरबंद, अंमली पदार्थ विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी, चव्वेचाळीस लाखाचा माल हस्तगत

चरस, गांजाची विक्री करणारा टोळका जेरबंद, अंमली पदार्थ विरोधी…

पुणे : कात्रज परिसरातून चरस, गांजाचा मोठा साठा जप्त; अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या अरुण अरोराकडून 44 लाखाचा माल हस्तगत कात्रज: अंमली…
फरार अट्टल गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई,वारजे माळवाडी पोलिसांची लोणावळ्यात कारवाई

फरार अट्टल गुन्हेगार व त्याच्या साथीदारांवर मोक्का कारवाई,वारजे माळवाडी…

वारजे: जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्ह्यात पोलिसांनी आरोपी सह साथीदारांवर मोक्का कारवाई केली. त्यातून तो जामीनावर सुटल्यानंतरही त्याची गुन्हेगारी थांबत…
पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अजुन अस्पष्ट

पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अजुन अस्पष्ट

भोसरी: पिंपरी-चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी परिसरात प्लास्टिक आणि रबर बनवणाऱ्या कंपनीला भीषण आग लागली आहे. संध्याकाळी पावणेसातच्या सुमारास आग लागल्याची माहिती अग्निशमन…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *