नशेबाज तरुणाईमुळें लोणी काळभोर परीसरात होत आहे गुन्हेगारीत वाढ
- क्राईमदेशपुणे
- January 11, 2025
- No Comment
लोणी काळभोर प्रतिनिधी महाराष्ट्र क्राईम वॉच दिगंबर जोगदंड-
लोणी काळभोर : लोणी काळभोर (ता. हवेली ) येथील अवैध धंदे रोखण्यास लोणी काळभोर पोलीस सपशल अपयशी
पानाच्या विड्यातून नशा करणे दारु, गुटखा, मटका, हुका हे धंदे तेजीत
लोणी काळभोर परिसरामध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट असून अवैध धंद्यामुळे रोज होत आहे लोणी काळभोर परिसरामध्ये गुन्हेगारीला वाढ ही गुन्हेगारी ह्या अवैध धंद्यांमुळेच नशेडी पानामुळेच सध्या होत आहे अशी चर्चा लोणी काळभोरमध्ये पाहायला मिळते नक्की ह्या अवैध धंद्यांना लोणी काळभोर पोलीस प्रशासन का सहकार्य करत आहे अशी चर्चा सध्या लोणी काळभोर नवे तर चार पाच गावांमध्ये रंगताना दिसत आहे तू दे मेवा मी करतो तुझी सेवा ही परिस्थिती सध्या लोणी काळभोर भागांमध्ये पाहायला मिळत आहे.
अशा अवैध धंद्यामुळे गुन्हेगार सध्या जोमात आहे हे अवैध धंदे नक्की कोणाचे आहेत ह्या अवैध धंद्यांचा मास्टर माइंड कोण आहे गुन्हेगारांना कोण पैसा पुरवत आहे हे गुन्हेगार सध्या दोन ते तीन महिन्यांमध्ये कुठून आलेले आहेत अनेक वर्षापासून लोणी काळभोर सारख्या परिसरामध्ये शांतता होते परंतु अचानकपणे रोज दिवसाढवळ्या लोणी काळभोर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रोज एक गुन्हेगार पाहायला मिळतोय पोलीस प्रशासन गप्प का पोलीस प्रशासनाला नक्की कोणाचा मेवा येत आहे परंतु मेवा जरी देत असतील तरी मेवा घ्या परंतु सर्वसामान्याला न्याय द्या अशी चर्चा लोणी काळभोर मधील स्थानिक नागरिक करताना पाहायला मिळत आहे
अशा गुन्हेगारांना व अवैध धंद्यांना बंद करण्यासाठी लोणी काळभोर पोलीस स्टेशनला कोण सिंघम अधिकारी येईल का आणि ह्या गुन्हेगारी टोळीला बंद करेल का हे देखील आता पाहणं गरजेचं आहे.
काही दिवसापूर्वी लोणी काळभोर परिसरामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून धबधबा असणारे सिंघम म्हणून ओळख असणारे गरुड साहेब होते त्यानंतर राजेंद्र मोकशी देखील होते व शशिकांत चव्हाण साहेब हे देखील होते परंतु त्यांच्या कालावधीमध्ये लोणी काळभोर परिसरामध्ये गुन्हेगारीचा काळा पलट केला होता परंतु त्याच ठिकाणी दुसरे अधिकारी आल्यामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारीचे डोके वर निघाले आहेत परंतु लोणी काळभोर पोलीस स्टेशनला सिंघम अधिकारी यांची सध्या गरज आहे अशी चर्चा सध्या लोणी काळभोर मधील स्थानिक नागरिक करीत आहेत