पूर्ववैमनस्यातून तरुणाला चाकू, कोयत्याने मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    पूर्ववैमनस्यातून तरुणाला चाकू, कोयत्याने मारहाण, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    पिंपरी: पूर्वीच्या भांडणातून पाच जणांच्या टोळक्याने एका तरुणावर चाकूने वार करत बेदम मारहाण केली. तसेच, परिसरात दहशत निर्माण केल्याची घटना रहाटणी येथे घडली.

    मन्सुर मेहबुब शेख (वय २४, रा. काळेवाडी) यांनी काळेवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सुरज प्रकाश पिंगळे (वय २४, रा. रहाटणी) व शुभम अभिमान जाधव (रा. गुजरनगर, थेरगाव) या दोघांना अटक केली आहे. तर, तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मन्सुर व सुरज यांच्यामध्ये एक महिन्यापूर्वी वाद झाला होता. बुधवारी मन्सुर व त्यांचा मित्र प्रसाद चव्हाण उभे असताना त्यांना सुरज याने बोलावून घेतले. त्यावेळी मागच्या भांडणाचा राग मनात धरून सुरजने इतर साथीदारांना बोलावत मन्सुर यांना मारहाण केली. ‘तू काय इथला भाई झालाय का, मी इथला भाई आहे, माझी दहशत माहित नाही का तुला, असे म्हणत मन्सुर यांच्यावर चाकूने वार केला. तर, सुरजच्या साथीदाराने हातातील कोयत्याने वार केला. मात्र, तो मन्सुर यांनी चुकवला. त्यांचा मित्र प्रसाद वाचवण्यासाठी आला असता त्याला देखील मारहाण केली.

    Related post

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची देणगी

    समाजासाठी मोठं हृदय – कालिदास ढमढेरे यांची ५ लाखांची…

    भीमनगर येथील गो-हे खुर्द येथे समाज मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर एक प्रेरणादायी घटना घडली आहे. स्थानिक उद्योजक मा. श्री. कालिदास (दादा)…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन निवडणुकीत ८०१ मतदार मतदानाचा हक्क…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे: गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या निवडणुकीत यंदा एकूण ८०१ मतदार मतदानाचा हक्क बजावणार…
    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर गाड्यांचे अतिक्रमण; नागरिक त्रस्त

    कसबा पेठेत न्यू गंधर्व बँडकडून अनधिकृत शेड व रस्त्यावर…

    पुण्यातील कसबा पेठ परिसरात न्यू गंधर्व बँड या व्यवसायिकाकडून अनधिकृत शेड उभारणे, डेकोरेशनचे साहित्य सार्वजनिक जागांवर अस्ताव्यस्त ठेवणे आणि बँडच्या गाड्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *