• March 6, 2025
  • No Comment

संरक्षण खात्याच्या तळेगाव डेपो येथे कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४ जणांना ४३ लाखांचा गंडा

संरक्षण खात्याच्या तळेगाव डेपो येथे कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून ४ जणांना ४३ लाखांचा गंडा

    पिंपरी : संरक्षण खात्याच्या तळेगाव डेपो येथे कायमस्वरूपी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून डेपोत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानेच देहूगाव येथील चार जणांकडून ४३ लाख रुपये उकळल्याचा प्रकार समोर आला आहे. संशयिताने आर्मीचे सिम्बॉल असलेल्या पत्रावर खोट्या सह्या – शिक्क्यांचे बनावट नियुक्तीपत्र व प्रवेशपत्र देऊन नोकरी न लावता फसवणूक केली. हा प्रकार १५ ऑक्टोबर २०२३ ते ४ मार्च २०२५ या कालावधीत घडला

     

    सुभाष मगन पवार (५१, रा. खालुम्ब्रे ता. खेड) असे अटक केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. कविता कैलास टिळेकर (४०, रा. श्रीकृष्ण मंदिरासमोर, माळवाडी, देहूगाव, ता. हवेली) यांनी देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी याबाबत माहिती दिली. संशयित पवार हा तळेगाव डेपोमध्ये पॅकर या पदावर काम करतो. गेल्या वर्षभरापासून तो कामावर गेलेला नाही. पवार याने फिर्यादी टिळेकर यांच्यासह इतर तीन लोकांना तळेगाव डेपो येथे कायमस्वरूपी नोकरी लावतो, असे सांगून शासकीय कागदपत्रे ही दाखवली. फिर्यादीसह इतरांचा विश्वास संपादन केला. फिर्यादीसह इतरांच्या मुलांना नोकरी लावण्यासाठी पवार यांनी त्यांच्याकडून एकूण ४३ लाख रुपये घेतले. तसेच, आर्मीचे सिम्बॉल असलेल्या पत्रावर खोट्या सह्या व शिक्क्यांचे बनावट नियुक्तीपत्र व प्रवेश पत्रही त्यांना दिले. मात्र, नोकरी न लावता सर्वांची फसवणूक केली

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *