• March 6, 2025
  • No Comment

यवतमध्ये घरावर पडला दरोडा; हल्ल्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

यवतमध्ये घरावर पडला दरोडा; हल्ल्यामध्ये एकाचा दुर्दैवी मृत्यू, तीन जण गंभीर जखमी

    पुणे: पुणे जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील यवत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मध्यरात्री दरोडेखोरांच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर कुटुंबातील तीन सदस्य गंभीर जखमी झाले आहेत. यवतमधील रेल्वे स्टेशन रोड परिसरात राहणाऱ्या चव्हाण कुटुंबाच्या घरावर मध्यरात्री दरोडा पडला आहे. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात चव्हाण यांच्या तरुण मुलाने आपला जीव गमावला आहे, तर चव्हाण दांपत्य आणि घरातील आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी सध्या घटनास्थळी पोहचले असून दरोडेखोरांचा माग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, यवतमधील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये चव्हाण कुटूंब राहते, त्यांच्या घरावरती मध्यरात्री दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी शस्त्रांनी केलेल्या हल्ल्यात चव्हाण यांच्या तरुण मुलाने आपला जीव गमावला आहे, तर चव्हाण दांपत्य आणि घरातील आणखी एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर या घटनेने सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *