• November 3, 2022
  • No Comment

स्वप्न दाखवून तिचा अश्लील व्हिडीओ केला एका पॉर्न वेबसाईटवर अपलोड, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

स्वप्न दाखवून तिचा अश्लील व्हिडीओ केला एका पॉर्न वेबसाईटवर अपलोड, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    वारजे: पुण्यातील वारजे परिसरातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. अल्पवयीन मैत्रिणीला पॉर्नस्टार होण्याचे स्वप्न दाखवून तिचा अश्लील व्हिडीओ एका पॉर्न वेबसाईटवर अपलोड केलाय. याप्रकरणी एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. वारजे पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी आणि आरोपी दोघेही अल्पवयीन आहेत. या दोघांची ओळख सोशल मीडियावरुन झाली होती. दोघे ही एकमेकांना भेटले देखील होते आणि त्यानंतर त्यांची मैत्री वाढत गेली. त्यानंतर मित्राने तिला आंतरराष्ट्रीय पॉर्नस्टार बनवतो असे आमिष तिला दाखवले. तिला अश्लील व्हिडिओ तयार करण्यास भाग पाडलं. मित्राने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेऊन तिने काही व्हिडिओ त्याला पाठवले. हेच व्हिडिओ तिच्या मित्राने एका पोर्न वेबसाईटवर अपलोड केले.

    दरम्यान पीडित मुलीच्या मैत्रीणीला एका अश्लील वेबसाईटवर तिचा हा व्हिडीओ दिसला. तिने पीडितेला याबद्दल माहिती दिली. पिडीत मुलीने कुटुंबीयांना याबद्दल माहिती दिली. मात्र कुटुंबीयांनी बदनामी पोटी याविषयी कुठेही वाच्यता केली नाही. पोलिसांना हा प्रकार समजल्यानंतर त्यांनी याप्रकरणी तक्रार दिली आणि आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वारजे पोलिस पुढील तपास करत आहेत

    Related post

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला; दोघे अटकेत

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : वैमनस्यातून एका तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने हल्ला केल्याची घटना हडपसर परिसरातील रामटेकडी येथे घडली आहे. या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *