• November 3, 2022
  • No Comment

पत्नीच्या मित्रावर प्राणघातक हल्ला, पतीवर गुन्हा दाखल

    लोणी काळभोर: पत्नीला भेटण्यासाठी आलेल्या तिच्या मित्राला पतीने लाथाबुक्याने आणि लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. हवेली तालुक्यातील वडकी नाला येथे हा सर्व प्रकार घडला.

    या प्राणघातक हल्ल्यात एक व्यक्ती जबर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लोणी काळभोर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    विशाल कामठे (वय 23) हा तरुण या घटनेत गंभीर जखमी झाला आहे. आरोपी संतोष माणिक जाधव यांच्या विरोधात पुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल महादेव मगर (वय 27) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, विशाल कामटे हा फिर्यादी राहुल मगर यांचा भाचा आहे. वडकी नाला परिसरातील एका लॉज जवळ ओळखीच्या महिलेला भेटण्यासाठी गेला होता. यावेळी त्या महिलेचा पती त्या ठिकाणी आला आणि त्याने माझ्या पत्नीला का बोलतो आणि तिला का भेटतो या कारणावरून विशाल कामठे याच्यासोबत वाद घातला.

    त्यानंतर चिडून जाऊन त्याला ठार मारण्याच्या उद्देशाने लाथा बुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने शरीरावर आणि डोक्यात जबर मारहाण केली. यामध्ये विशाल कामठे हा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक हंबीर अधिक तपास करत आहेत.

    Related post

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी शासनाचे लक्ष वेधले

    आझाद मैदानावर महा-ई-सेवा केंद्र चालकांचे राज्यव्यापी आंदोलन; विविध मागण्यांसाठी…

    मुंबई: दि. १ जुलै : अखिल स्तरीय महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संघटनेच्या वतीने आज मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी धरणे…
    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *