• November 3, 2022
  • No Comment

किरकोळ वादातून व्यावसायिकावर कोयत्याने वार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

किरकोळ वादातून व्यावसायिकावर कोयत्याने वार, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    चिंचवडः मयत व्यक्तीबद्दल बोलला म्हणून चार ते पाच जणांना कोयत्याने वार करत व्यावसायीकाला गंभीर जखमी केले आहे. ही घटना लिंक रोड येथे रेल्वे पटरीच्या बाजूला घडली. याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सनी ज्ञानू शिरसाठ (वय 37 रा.पिंपरी) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी सद्दाम,सोहेल याना पोलिसांनी अटक केली असून कपाळ्या उर्फ आकाश काळे, बाळ्या उर्फ विजय काळे, इरफान शेख व त्याचे साथीदार यांच्यावर चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्याा माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी शेख व बाबा रणदिवे यांचे पुर्वी भांडण झाले होते. बाबा रणदिवे हा कोरोनाकाळत मयत झाला. त्यानंतर एका कार्यक्रमात फिर्यादी यांनी रणदिवे याबद्दल बोलताना तो मेला गेला खड्यात असे बोलले.ही गोष्टी शेख ला समजताच शेख व त्याचे साथीदार यांनी 3 ऑक्टोबर रोजी फिर्यादी यांना गाठून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण करत कोयत्याने डोक्यावर व पाठीवर वार करत गंभीर जखमी केले. तसेच परिसरात कोयते नाचवून दहशत पसरवली.यावरून चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *