• November 3, 2022
  • No Comment

बनावट पोलिसांनी नागरिकाचे अपहरण करत लुटले

बनावट पोलिसांनी नागरिकाचे अपहरण करत लुटले

    खेड: बनावट पोलिसांनी नागरिकाचे अपहरण करून मारहाण करत लुटले आहे. हा प्रकार खेड येथील पिंपळगाव येथे घडली.

    विशाल विष्णू देवकर (वय 38 रा.भोसरी) यांनी फिर्याद दिली असून तीन अज्ञाता विरोधात आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पिंपळगाव येथे रोडवर उभे असताना आरोपी लाल रंगाच्या ब्रेझा गाडीमधून आले व त्यांनी फिर्यादी यांना पोलीस असल्याचे सांगत फिर्यादीच्या गाडीची कागदपत्रे मागितली, तसेच फिर्यादी यांना पोलीस असल्याचे सांगत गाडीत बसवून लांब घेऊन गेले. फिर्यादीचा 68 हजार रुपयांचा मोबाईल काढून घेतला. यावेळी फिर्यादी यांनी विरोध केला असता आरोपींनी हाताने व लोखंडी मारहाण करून जखमी केले. यावरून आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *