• November 3, 2022
  • No Comment

ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण करण्याकरीता मुदतवाढ

ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण करण्याकरीता मुदतवाढ

    पुणे: प्रादेशिक परिवहन प्राधिकरण पुणे यांनी पुणे, पिंपरी-चिंचवड व बारामती या कार्यक्षेत्रातील तीन आसनी ऑटोरिक्षांकरिता खटुआ समितीच्या शिफारशीनुसार 1 सप्टेंबर 2022 पासून भाडेवाढ लागू केलेली असून ऑटोरिक्षांचे मीटर पुनःप्रमाणीकरण करण्याकरीता 30 नोव्हेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

    ऑटोरिक्षा चालक, मालकांना ऑटोरिक्षांचे मीटर पुन:प्रमाणीकरण विहीत मुदतीत करुन घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

    ऑटोरिक्षा धारकांनी त्यांच्या ऑटोरिक्षा भाडेमीटरचे पुनःप्रमाणीकरण व मीटर तपासणीचे काम विहीत मुदतीत न केल्याने तसेच ऑटोरिक्षा संघटनांकडून ऑटोरिक्षा परवानाधारक, पालकांची गैरसोय टाळण्यासाठी मीटर पुनःप्रमाणीकरणाकरीता मुदतवाढ मिळण्याबाबत केलेल्या मागणीचा विचार करता मीटर पुनःप्रमाणीकरण करण्यास 30 नोव्हेंबर पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरण, प्राधिकरणाने घेतला आहे.

    मुदतीत मीटर कॅलीब्रेशन करून न घेणाऱ्या ऑटोरिक्षाधारकांवर परवाना निलंबन किंवा तडजोड शुल्काची कारवाई करण्यात येणार आहे. मुदतीत मीटर कॅलीब्रेशन न केल्यास मुदत समाप्तीनंतर विलंबासाठी किमान 7 दिवस व त्यापेक्षा अधिक प्रत्येक एक दिवसासाठी 1 दिवस आणि एकूण कमाल निलंबन कालावधी 40 दिवस राहणार आहे. निलंबनाऐवजी तडजोड शुल्काचा विकल्प घेतल्यास मुदत समाप्तीनंतरच्या प्रत्येक दिवसासाठी 50 रूपये मात्र किमान 500 रूपये आणि कमाल तडजोड शुल्क 2 हजार रूपयांपर्यंत असेल, असेही प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे यांनी कळविले आहे.

     

     

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *