• December 4, 2022
  • No Comment

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; पुण्यातील घटना

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार; पुण्यातील घटना

    दोन लग्न झालेली असताना स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 24 वर्षांच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची खळबळजनक घटना पुण्यात घडली आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. हा प्रकार 8 जून 2022 ते 11 नोव्हेंबर 2022 या कालावधीत घडला आहे.

    याबाबत 24 वर्षीय पीडित मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी सोमनाथ संभाजी कोदरे (वय 38, रा. मातोश्री बिल्डिंग, केशवनगर, मुंढवा) याच्यावर आयपीसी 376, 376 (2)(एन) नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करते. पुण्यातील सदाशिव पेठेत ती राहते. काही दिवसांपूर्वी तिने अपना अ‍ॅपच्या माध्यमातून नोकरीसाठी अर्ज केला होता.
    या माध्यमातून पीडित मुलीला हॉटेल रीजन्सी येथून फोन आला होता.
    तेव्हा आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख झाली.
    आरोपीने फिर्यादी यांना आपणच हॉटेलचा मालक असल्याचे सांगून मैत्री केली.


    मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांच्यामध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.
    दरम्यान, आरोपीने आधीच दोन लग्न केलेली होती. ही माहिती फिर्यादी यांच्यापासून लपवून ठेवत त्याने
    लग्नाचे आमिष दाखवले. आरोपीची दोन लग्न झाल्याची माहिती फिर्यादी यांना समजली.
    फिर्यादी यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली.
    पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक मुळुक करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *