• December 4, 2022
  • No Comment

हॉटेलचे भाडे मागितल्यावरून टोळक्याकडून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न; धनकवडीमधील घटना

हॉटेलचे भाडे मागितल्यावरून टोळक्याकडून तरुणाला जिवे मारण्याचा प्रयत्न; धनकवडीमधील घटना

    पुणे:भाड्याने चालवण्यास दिलेल्या चायनीज हॉटेलचे भाडे मागितल्याच्या कारणावरून चार जणांच्या टोळक्याने तरुणाला लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. या घटनेत तरुण आणि त्याचा मित्र जखमी झाले आहेत. हा प्रकार गुरुवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास धनकवडी येथील तीन हत्ती चौकातील सार्वजनिक रोडवर घडला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली
    याबाबत विनोद नेमीनाथ जंगम (वय 24, रा. तळजाई पठार, पुणे) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी मुकेश शिवाजी इंगळे (वय 45), निकिता मुकेश इंगळे (वय 35, रा. संतोषनगर, कात्रज), ऋषिकेश बर्डे (वय 22, रा. कात्रज), तन्मय उर्फ बिट्टू मुकेश इंगळे (वय 17, रा. कात्रज) यांच्यावर आयपीसी 307, 324, 323, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी मुकेश इंगळे याला अटक केली.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांनी त्यांचे आर्या चायनीज हॉटेल आरोपी मुकेश इंगळे याला भाड्याने चालवण्यास दिले आहे. फिर्यादी हे वारंवार हॉटेलचे भाडे मागत होते. याचा राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी रात्री फिर्यादी हे हत्ती चौकातील उषा पॅलेससमोरील सार्वजनिक रोडवर थांबले होते. त्यावेळी आरोपी त्या ठिकाणी आले. आमच्याकडे पैसे मागतो का? आज तुला संपवूनच टाकतो असे म्हणत ऋषिकेश बर्डे याने फिर्यादी यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. मात्र, फिर्यादी यांनी हा वार चुकवल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली.

    तर मुकेश इंगळे याने फिर्यादी यांच्या पाठीवर चाकूने वार केला. परंतु, वार चुकवल्याने त्याचा शर्ट फाटला.
    तसेच निकिता इंगळे हिने फिर्यादी यांचा गळा दाबला तर तन्मय याने पट्ट्याने बेदम मारहाण केली.
    हा वाद सोडवण्यासाठी फिर्यादी यांचा मित्र शुभम दाते हा आला असता आरोपींनी त्यालाही बेदम मारहाण केली.
    तसेच बर्डे याने फरशीचा तुकडा फेकून मारल्याने शुभम दाते हा जखमी झाला.
    पोलिसांनी आरोपींवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून मुकेश इंगळे याला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *