- October 7, 2022
- No Comment
परवानगी शिवाय माझ्या एरियात काम केले म्हणून एकाला शिवगाळ करत मारहाण
चाकण: मला न विचारता माझ्या एरियात काम कसे काय करतो म्हणून एका बांधकाम व्यावसायिकाला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली आहे. हा प्रकार चाकण येथे घडला.
याप्रकरणी शरद पंडितराव शिंदे (वय 42 रा.चाकण) यांनी मंगळवारी (दि.4) फिर्याद दिली असून चाकण पोलिसांनी सागर बाबासाहेब लोणरी (वय 30 रा.भोसे, खेड) याला चाकण पोलिसांनी अटक केले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे शिक्रापूर रोड लगत बांधकाम करत असताना आरोपी तेथे आला व त्याने तु माझ्या परवानगी शिवाय या एरियात काम कसे करतोय. तु मला भेटायला का नाही आली म्हणत आरोपीने फिर्यादीला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या भागात माझ्या परवानगी शिवाय कोणीही काम करत नाही. माझी या भागात दहशत आहे. बांधकाम करयाचे असेल तर मला हप्ता द्यावा लागेल म्हणत शिवीगाळ केली. यावेळी फिर्यादी त्याला समजावून सांगत असताना त्याने फिर्यादीला मारहाण केली. यावरून पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.