- October 7, 2022
- No Comment
दहशत पसरवणारा तडीपार टोळका गजाआड
मोशी: गोळ्या घालण्याची भाषा करत परिसरात मीच इथला भाई आहे म्हणत दहशत पसरवणाऱ्या तडीपार सराईताला 24 तासाच्या आत पोलिसांनी गजाआड केले आहे. हा प्रकार मोशी येथील नागेश्वर मंदिरा जवळ घडला.
चंदन सुरेंद्र सिंग (वय 35 रा.थेरगाव) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुंडा विरोधी पथकाचे पोलीस हवालदार विजय तुकाराम गंभिरे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याला 23 नोव्हेंबर 2021 रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ दोन यांनी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले होते. तरीही त्याने आदेशाचा भंग करत मंगळवारी आरोपी मोशी परिसरात आला. त्याच्याकडे एक देशी बनावटीची लोखंडी पिस्टल व 2 जिवंत काडतुसे होती. शस्त्रासह परिसरात फिरत मीच आहे पिंपरी-चिंचवडचा भाई चंदनसिंग, मला कोणी डिवचले तर एकएकाला गोळ्या घालून मारून टाकेन.माझ्या नादाला लागून नका म्हणून मोठमोठ्य़ाने ओरडत परिसरात दहशत पसरवत होता. पोलिसांना खबर मिळताच गुंडा विरोधी पथकाने त्याला शस्त्रासह अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्ह दाखल करण्यात आला असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.