• January 12, 2025
  • No Comment

बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत मोठी कारवाई

बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा, पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत मोठी कारवाई

    पिंपरी: बेकायदा पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होऊन वाहतूक कोंडी होऊ शकते, याचा कसलाही विचार केला जात नाही. मात्र, त्याविरोधात वाहतूक पोलिसांनी जोरदार कारवाई सुरू केली असून नियमांचे उल्लंघन करून रस्त्यावर कुठेही वाहन करणे आता चालकांना चांगलेच महागात पडत आहे.

    पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत टोइंग व्हॅन योजना कार्यान्वित करण्यात आली आहे. या अंतर्गत वाहतुकीस अडथळा ठरतील, अशी वाहनांना टोइंग करुन दंड आकारण्याबाबत कारवाई जोरात सुरू आहे. मागील महिनाभरात विविध वाहतूक विभागांतर्गत ५ हजार ८४५ वाहनांवर टोइंग कारवाई करण्यात आली असून ३२ लाख ८५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

    पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. अनेकजण दुचाकी व चारचाकी वाहनांचा वापर करीत असतात. मात्र, काहीजण पार्किंगचे नियम न पाळता बेशिस्तरित्या कुठेही वाहन उभे करतात. अशी स्थिती अनेक मार्गांवर पाहायला मिळते. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो, अशा वाहनांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारला जात आहे.

     

    – दुचाकी वाहन टोइंग केल्यास त्या वाहनाला ५०० रुपये दंड, २०० रुपये टोइंग शुल्क आणि ३६ रुपये जीएसटी असा एकूण ७३६ रुपयांच्या दंडाची वसुली

    – चारचाकी वाहनाला ५०० रुपये दंड, ४०० रुपये टोइंग शुल्क आणि ७२ रुपये जीएसटी असा एकूण ९७२ रुपयांचा दंड

    – टोइंग कारवाई केलेल्या वाहनांवर पूर्वीचा दंड प्रलंबित असल्यास प्रलंबित दंडापैकी किमान एक दंड टोइंगच्या दंडासोबत भरणे बंधनकारक

     

    वाहन रस्त्यावर कुठेही बेकायदेशीर, अस्ताव्यस्तपणे उभे केल्यास टोइंग व्हॅनद्वारे कारवाई केली जात आहे. ही कारवाई यापुढेही सुरू राहणार आहे. तरी वाहन चालकांनी नियमांप्रमाणेच वाहन उभे करावे, जेणेकरून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही.

    – बापू बांगर, पोलिस उपायुक्त, वाहतूक शाखा, पिंपरी-चिंचवड

    सुमारे ५ हजार वाहनांवर कारवाई

    शहरात ५ डिसेंबर २०२४ पासून कारवाईला सुरुवात झाली. यासाठी वाहतूक विभागांना टोइंग व्हॅन देण्यात आल्या आहेत. मागील महिनाभरात विविध ठिकाणी ५ हजार ८४५ वाहनांवर टोइंग कारवाई करण्यात आली आहे. तर ३२ लाख ८५ हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *