• January 12, 2025
  • No Comment

भरधाव मोटार दुकानाचा दरवाजा तोडून शिरली आत, चार अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

भरधाव मोटार दुकानाचा दरवाजा तोडून शिरली आत, चार अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात

पुणे: भरधाव वेगाने मोटार चालवताना नियंत्रण सुटल्याने मोटार थेट दुकानाचा लोखंडी दरवाजा तोडून आत शिरल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री टिळक रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले, सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही.

पसार होण्याच्या तयारीत असलेल्या अल्पवयीनांना रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्पवयीन मुले एका मित्राच्या मोटारीतून शनिवारी मध्यरात्री डेक्कन जिमखाना परिसरात गेले होते. एका उपाहारगृहात जेवण केल्यानंतर मध्यरात्री ते मोटारीतून टिळक रस्त्याने स्वारगेटकडे निघाले होते. मोटारीतून भरधाव वेगाने निघालेल्या मोटार चालविणाऱ्या अल्पवयीनाचे नियंत्रण सुटले. साहित्य परिषद चौकाजवळ मोटार थेट पदपथावर चढली. मोटार एका दुकानाच्या दरवाज्यावर आदळली. धडक एवढी जोरात होती की दुकानाचा लोखंडी दरवाजा तुटला.

अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. गाढ झोपेत असलेले रहिवासी जागे झाले. मोटारचालक अल्पवयीन आणि त्याचे मित्र घाबरलेले होते. मुलांनी परस्पर एका क्रेनचालकाला दूरध्वनी केला. मोटार जागेवरुन हलविण्यास सांगितले. अपघातानंतर आवाजाने जागे झालेल्या रहिवाशांनी तेथे धाव घेतली. रहिवाशांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर या घटनेची माहिती विश्रामबाग पोलिसांना कळविण्यात आली. गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. मुलांना ताब्यात घेण्यत आले. या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही, अशी माहिती पोलिसांना दिली.

Related post

अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून  अटक

अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी…

पुणे : अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी आलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडून त्यांच्याकडून ४ किलो ८०१ ग्रॅम गाजा हस्तगत केला…
पुणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन शहरात नव्या सात पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आल्यानंतर आता या सात पोलीस ठाण्यांची हद्द निश्चिती

पुणे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन शहरात नव्या…

पुणे : शहराचा वाढता विस्तार, गुन्हेगारी आणि त्यामुळे निर्माण होणारा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन शहरात नव्या सात पोलीस ठाण्यांना…
विम्याच्या नावाखाली तरुणाची ९० हजार ७८० रुपयांची ऑनलाइन फसवणूक

विम्याच्या नावाखाली तरुणाची ९० हजार ७८० रुपयांची ऑनलाइन फसवणूक

पिंपरी : क्रेडीट कार्डवरील विमा नको असल्यास प्रोसेस करून ओटीपी नंबर सांगण्यास भाग पाडून त्याद्वारे एका तरुणाची ९० हजार ७८० रुपयांची…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *