- January 13, 2025
- No Comment
चरस, गांजाची विक्री करणारा टोळका जेरबंद, अंमली पदार्थ विरोधी पथकाची उल्लेखनीय कामगिरी, चव्वेचाळीस लाखाचा माल हस्तगत

पुणे : कात्रज परिसरातून चरस, गांजाचा मोठा साठा जप्त; अंमली पदार्थांच्या विक्रीसाठी आलेल्या अरुण अरोराकडून 44 लाखाचा माल हस्तगत
कात्रज: अंमली पदार्थ विरोधी पथकाने विक्रीसाठी आलेल्या गुन्हेगाराला पकडून त्याच्याकडून ४३ लाख ८७ हजार रुपयांचा चरस, गांजा जप्त केला आहे.
अरुण अशोक अरोरा (वय ५०, रा. प्रितम हाईटस, मांगडेवाडी, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक व त्यांचे सहकारी भारती विद्यापीठ परिसरात गस्त घालत होते. यावेळी पोलीस अंमलदार योगेश मांढरे यांना मिळालेल्या बातमीवरुन पोलिसांनी अशोक अरोरा याला पकडले. त्याच्या ताब्यातून २ किलो १४० ग्रॅम चरस व १ किलो ७९० ग्रॅम गांजा व इतर ऐवज असा ४३ लाख ८७ हजार रुपयांचा माल जप्त केला आहे. त्याच्याविरुद्ध भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात एनडीपीएस अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार योगेश मांढरे, प्रशांत बोमादंडी, नितीन जगदाळे, आझाद पाटील, संदिप जाधव दिशा खेवलकर, रवींद्र रोकडे यांनी केली.