• January 13, 2025
  • No Comment

लोणी काळभोर येथील एमआयटी कॉर्नर जवळ टोळक्याकडून तिघांना बेदम मारहाण

लोणी काळभोर येथील एमआयटी कॉर्नर जवळ टोळक्याकडून तिघांना बेदम मारहाण

    लोणी काळभोर: मागील एक महिन्याच्या कालावधीत लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एमआयटी मध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या टोळक्यांनी एकमेकांना शिवीगाळ करून मारहाणी केल्याच्या तीन हून अधिक घटना घडल्या आहेत.

    अशातच आता विद्यार्थ्यांच्या टोळक्याने तिघांना दगडासह लाठी काठीने कपडे फाटेपर्यंत बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना एमआयटी कॉर्नर परिसरात असलेल्या इस्ट हेवन सोसायटीजवळ सोमवारी (ता. 13) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. वारंवार होणाऱ्या अशा प्रकारच्या घटनांमुळे परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

     

    लोणी काळभोर (ता. हवेली) येथे एमआयटी हे एक शैक्षणिक संकुल आहे. या संकुलात हजारो विद्यार्थी शिक्षण घेतात. तर काही विद्यार्थी संकुलाच्या वसतिगृहात राहतात. तर काही विद्यार्थी एमआयटीने संकुलाच्या बाहेरच्या परिसरात भाडेतत्वावरील घेतलेल्या वस्तीगृहात राहतात. तर काही विद्यार्थी स्वत: फ्लॅट घेऊन मित्रांसोबत भाडेतत्वावर राहतात.

     

    एमआयटी कॉर्नर परिसरातील होस्टेलमध्ये शेकडो विद्यार्थी राहतात. या ठिकाणी शाळा, बँक, हॉटेल व विविध दुकाने आहेत. या परिसरात क्रीओंन प्री प्रायमरी स्कूल देखील आहे. या स्कूलची शाळा दररोज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सुटते. मुलांना घरी नेण्यासाठी त्यांचे पालक येत असतात. सोमवारी (ता.13) दुपारी एक वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे शाळा सुटली. तेव्हा शाळेच्या जवळ असलेल्या इस्ट हेवन सोसायटीसमोर विद्यार्थ्यांमध्ये दगडासह लाठी काठीने मारहाण सुरु झाली.

     

    या घटनेत एकाला कपडे फाटेपर्यंत मारहाण केली. तर दोन विद्यार्थी पळून जाण्यास यशस्वी ठरल्याने बचावले आहेत. या मारहाणीत क्रेयॉन्स प्री स्कूल मध्ये पाल्याला नेण्यासाठी आलेल्या वयोवृद्ध आजोबाच्या पोटात दगड लागला आहे. तर शाळेच्या शिक्षकांनी समयसूचकता दाखविल्याने सर्व विद्यार्थ्यांना पुन्हा शाळेत घेतले. शाळेचे गेट बंद केल्यामुळे सुदैवाने या मारहाणीत लहान विद्यार्थी बचावले आहेत.

    दरम्यान, एमआयटी कॉर्नर परिसरात विद्यार्थ्यांची काही वस्तीगृहे आहेत. या ठिकाणी मागील एक महिन्याच्या कालावधीत वारंवार भांडणे व हाणामारी होत आहेत. ही भांडणे बहुतांशी विद्यार्थ्यांमध्ये अथवा फ्लॅट मालकांसोबत किरकोळ कारणावरून होत असतात. मात्र, भांडणे लागल्यानंतर विद्यार्थ्यांनी त्याच्या मित्रांना टोळक्याने बोलाविले जाते. त्यानंतर समोरच्या विद्यार्थ्याला बेदम मारहाण करण्यात येते. या वारंवार होणाऱ्या भांडणांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन काय व कोणावर कारवाई करणार? याकडे सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *