• January 13, 2025
  • No Comment

गुंडाकडून व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, आरोपी पसार

गुंडाकडून व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण, आरोपी पसार

    शिवणे (पुणे): पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वारजे माळवाडी परिसरात लाँन्ड्री व्यावसायिकाकडे महिन्याला पाच हजार रुपये हप्त्याची मागणी करुन दुकानाची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली आहे.

    याप्रकरणी सराइतावर वारजे पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सराइताने परिसरात दहशत देखील माजवली. नंतर कारची काच फोडली. याप्रकरणी ओंकार उर्फ खंड्या वाघमारे (वय २१, रा. रामनगर, वारजे) याच्यावर गु्न्हा दाखल केला आहे. याबाबत एका लाँन्ड्री व्यावसायिकाने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदाराचे एनडीए रस्त्यावरील शिवणे भागात दांगट पाटीलनगर इस्त्री आाणि कपडे धुलाईचे दुकान आहे. आरोपी वाघमारे हा तीन दिवसांपूर्वी शिवणे भागात आला. त्याच्याकडे गज होता. ‘या भागाचा मी दादा आहे. या भागात व्यवसाय करायचा असेल, तर दरमहा पाच हजार रुपये हप्ता द्यावा लागेल’, अशी धमकी त्याने व्यावसायिकाला दिली. पैसे न दिल्यास दुकान जाळून टाकण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने व्यावसायिकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या भागातील एका कारची काच फोडली.

    शिवणे भागातील दांगट पाटीलनगर परिसरात लघुउद्योजकांचे कारखाने आहेत. या भागातील आणखी एका व्यावसायिकाला त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन खंडणी मागितली. त्याने कारखाना पेटवून देण्याची धमकी दिली. मी पोलिसांना घाबरत नाही, अशी धमकी देऊन तो पसार झाला. घाबरलेल्या व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली. पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे. वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलीस उपनिरीक्षक भरसट तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *