• January 13, 2025
  • No Comment

मुलीला माहेरी न पाठविल्याने सासु-सासरे, मेव्हण्याकडून जावयाला लोखंडी सळईने मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

मुलीला माहेरी न पाठविल्याने सासु-सासरे, मेव्हण्याकडून जावयाला लोखंडी सळईने मारहाण; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

    उत्तमनगर (पुणे): माहेरी लग्न असताना तू आता जाऊ नको, आपण दोघही नंतर जाऊ असे सांगितल्याच्या कारणावरुन सासु, सासरे, मेव्हण्याने चिडून जाऊन जावयाला लोखंडी सळईने बेदम मारहाण करुन जखमी केले.

    याबाबत राजेंद्र मालखान वाल्मिकी (वय ३६, रा. भैरवनाथ नगर, कोंढवे धावडे) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी सासरे मनोज हरिसिंह (वय ५६), सासु (वय ५०), मेव्हणा राजकुमार मनोज हरिसिंह (वय २४, सर्व रा. गाडीअड्डा, पीसीबी क्वाटर्स, खडकी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार कोंढवे धावडे येथील भैरवनाथनगर येथे ८ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजता घडला.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी राजेंद्र वाल्मिकी यांची पत्नी आशा हिच्या माहेरी लग्नाचा कार्यक्रम आहे. त्यासाठी आशा हिला माहेरी जायचे होते. तेव्हा राजेंद्र आपल्या पत्नीला म्हणाले की, लग्नासाठी आता तू जाऊ नकोस, आपण दोघेही नंतर जाऊ, असे म्हणाले. हे समजल्यावर फिर्यादीचे सासु सासरे फिर्यादीच्या घरी आले. तुम्ही आशा हिला आता माहेरी का पाठवत नाहीस या कारणावरुन चिडून जाऊन फिर्यादी यांना शिवीगाळ करुन हाताने मारहाण केली. यावेळी फिर्यादीचा मेव्हणा राजकुमार याने त्याच्याकडील लोखंडी सळईने फिर्यादी यांच्या डाव्या हाताच्या पंजास मारुन जखमी केले.

    पोलीस हवालदार भगत तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *