- January 14, 2025
- No Comment
तुळशीबागेत महिलेच्या पर्समधून ३० हजारांची रोकड लंपास, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे: मकर संक्रांती सणानिमित्त तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पर्समधून चोरट्याने ३० हजारांची रोकड लंपास केली. ही घटना विश्रामबागवाड्याजवळ एका कपड्याच्या दुकानाजवळ घडली.
याबाबत उरवणे (ता. मुळशी) येथील एका ३५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यावरून विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी महिला गृहिणी असून, त्या १२ जानेवारी रोजी सणानिमित्त कपडे खरेदी करण्यासाठी तुळशीबाग परिसरात आल्या होत्या. चोरट्याने गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधून ३० हजार रुपये चोरून नेले.




