• January 14, 2025
  • No Comment

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; आयटीतील तरुणी जागीच ठार

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात; आयटीतील तरुणी जागीच ठार

    शिरवळ: पुणे-सातारा महामार्गावरील झालेल्या भीषण अपघातात २४ वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे.

    ही दुर्दैवी घटना रविवारी 12 जानेवारी रोजी नीरा नदी पुलाजवळ शिंदेवाडी येथे घडली आहे. रुबेल सीन्हा (वय-२४) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. रुबेलच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील नामांकित आयटी कंपनीमध्ये कार्यरत तीन तरुण आणि एक तरुणी महाबळेश्वरला फिरण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यावेळी शिंदेवाडी (ता. खंडाळा) गावाजवळील नीरा नदी पुलावर भरधाव ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.

    दरम्यान, या धडकेत रुबेल ही रस्त्यावर कोसळली. अंगावरून ट्रक गेल्यामुळे तिचा जागीच मृत्यू झाला आहे. दुचाकी चालवणारा तरुण गंभीर जखमी झाला आहे. शिरवळ येथील खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी सुरळीत केली. तसेच जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *