• January 14, 2025
  • No Comment

सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी गजाआड;अल्पवयीन ताब्यात

सोनसाखळी, वाहनचोरी करणारी टोळी गजाआड;अल्पवयीन ताब्यात

    पिंपरी: सराईत गुन्हेगार आणि त्याच्या तीन अल्पवयीन साथीदारांनी सोनसाखळी चोरी आणि वाहन चोरीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. सराईताला पोलिसांनी अटक केली असून, दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.

    अन्य एक अल्पवयीन फरार आहे. त्यांच्याकडून सात लाख ७४ हजार ८६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, नऊ गुन्हे उघड झाले आहेत.

    आकाश वजीर राठोड (वय २४, रा. मुळशी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्या दोन अल्पवयीन साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी याबाबत माहिती दिली.

    पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत सोनसाखळीच्या घटना दाखल होत्या. याबाबत तपास करताना पोलिसांनी सराईत गुन्हेगारांच्या हालचालीवर लक्ष ठेवले. तसेच, गुन्हा घडलेल्या ठिकाणांवरील ‘सीसीटीव्ही फुटेज’चीही पाहणी केली. त्यावेळी त्यांना सराईत गुन्हेगार आकाश याच्याबाबत माहिती मिळाली. त्यानुसार, पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने अन्य तीन साथीदारांच्या मदतीने गुन्हे केल्याची कबुली दिली. त्यापैकी दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, आणखी एका साथीदाराचा शोध सुरू आहे.

    आरोपीकडून रावेत, निगडी, चिखली व आळंदी परिसरात सोनसाखळी आणि चाकण परिसरात वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याच्याकडून चोरलेले सात लाख ७४ हजार ८६० रुपये वजनाचे सोन्याचे दागिने व तीन दुचाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी आकाश याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये २१ गुन्ह्यांची नोंद आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *