• January 14, 2025
  • No Comment

कोथरूड भागात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; लाखों रुपयांना घातला गंडा

कोथरूड भागात सायबर चोरट्यांचा धुमाकूळ; लाखों रुपयांना घातला गंडा

    कोथरूड (पुणे): पुण्याच्या कोथरूड भागातुन धक्कादायक घटना समोर आली आहे. लष्करी अधिकारी असल्याचे सांगून सायबर चोरट्याने कोथरुड भागातील एका ज्येष्ठ नागरिकाची पाच लाख ३५ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

    आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठाने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. याप्रकरणी सायबर चोरट्याविरुद्ध कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    या प्रकरणी ज्येष्ठ व्यक्तीने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एका बंँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जेष्ठ नागरिक कोथरुडमधील गुरुगणेशनगर भागात एका सोसायटीमध्ये राहायला आहेत. डिसेंबर महिन्यात चाेरट्याने ज्येष्ठाच्या मोबाइल वर संपर्क साधला. चोरट्याने लष्करात अधिकारी असल्याची बढाई मारत म्हणाला कोथरूड भागात भाडेतत्त्वावर घर घ्यायचे आहे असे सांगितले. यासाठी तुम्हाला अनामत रक्कम पाठवितो असे सांगून ज्येष्ठाच्या बँक खात्याची माहिती घेतली.

    बँक खात्याच्या माहितीचा गैरवापर करुन चोरट्याने ज्येष्ठाच्या खात्यातून पाच लाख ३५ हजार २०० रुपये पळवल्याचे समोर आले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने कोथरूड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *