- January 14, 2025
- No Comment
अवैध बैलाची वाहतूक, मंचरमध्ये दोघांवर गुन्हा दाखल

मंचर: पुणे- नाशिक राष्ट्रीय महामार्गावर पेठ (ता. आंबेगाव) येथील ‘हॉटेल रानवारा’जवळ पिकअप वाहनात गावरान जातीचा बैल घेऊन जात होते. बैलास कोणत्याही प्रकारचा चारा पाण्याची व्यवस्था केलेली नव्हती.
बैल ताटकळत बांधलेला होता. बैल खरेदीची पावती, वैद्यकीय अधिकाऱ्याचे फिटनेस प्रमाणपत्र व वाहनाची कोणतीही कागदपत्रे जवळ नव्हती. या प्रकरणी मंचर पोलिसांनी दोन जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
अंकुश महादेव उगलमुगले (रा. नागापूर, आंधळे चैरे वस्ती, ता. जामखेड, जि. अहिल्यानगर, सध्या रा.शेलू, वासुली फाटा चाकण, ता. खेड) व खील सोमेश्वर कापगते (रा. भुज, पो. मुडझा, ता. ब्रम्हपुरी, जि. चंद्रपूर), अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. ते पिकअपमध्ये (क्र. एम.एच. १४ के.ए. १५४३) बैलास घेऊन जात होते. मंचर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले लखन संजय माने यांनी फिर्याद दाखल केली. त्यानुसार आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पुढील तपास पोलिस नाईक शेखर भोईर करत आहेत.




