• January 14, 2025
  • No Comment

पिंपरी-चिंचवड मध्ये थकबाकीदारांच्या दुकानाबाहेर वाजविणार बँड

पिंपरी-चिंचवड मध्ये थकबाकीदारांच्या दुकानाबाहेर वाजविणार बँड

    पिंपरी-चिंचवड: पिंपरी-चिंचवड शहरातील एक लाखाहून अधिक असणाऱ्या सर्व थकबाकीदारांच्या बिगरनिवासी, औ‌द्योगिक, मिश्र मालमत्तांवर जप्ती कारवाई सुरू आहे. यामध्ये खासगी संस्था, खासगी महावि‌द्यालये, शाळा, हॉटेल, खासगी रुग्णालये, पेट्रोल पंप, औ‌द्योगिक कारखाने, शोरूम, मंगल कार्यालय, बँक, मॉल, चित्रपटगृहे आदी आस्थापनांचा समावेश आहे.

    त्यामुळे सदरील आस्थापनांच्या नावे वृत्तपत्रात प्रसिध्द करून त्यांच्या दुकानाबाहेर बँड पथकाकडून बँड वाजविण्यात येणार आहे.

    महापालिकेच्या कर आकारणी व कर संकलन विभागाकडून एक लाखाहून जास्त थकबाकी असणाऱ्या सर्व थकबाकीदारांच्या बिगरनिवासी, औ‌द्योगिक, मिश्र मालमत्तांवर जप्ती कारवाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. एक लाखाहून अधिक थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांच्या मालमत्ता तत्काळ जप्त करण्याचे आदेश संबंधित विभागीय कार्यालयातील प्रशासन अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

    त्यानुसार, करसंकलन विभागाने १० जानेवारीपर्यंत तब्बल ४१८ मालमत्ता जप्त केल्या असून, त्यांच्याकडे तब्बल ११ कोटी ३७ लाख २३ हजार १९८ रुपयांचा मालमत्ताकर थकीत आहे. मालमत्ता जप्ती कारवाईवेळी १५११ मालमत्तांनी आपल्या थकीत कराचा २६ कोटी ९२ लाख ७३ हजार ७४९ इतक्या भरणा केलेला आहे.

    थकबाकीदारांना वारंवार आवाहन करूनदेखील कराचा भरणा केला नसेल अशा मालमत्तांवर जप्तीच्या कारवाईसाठी कठोर पाऊले उचलावीत असेही आदेश करसंकलन मुख्य कार्यालयाकडून विभागीय कार्यालयास देण्यात आले आहेत.

    सदर थकबाकी असणाऱ्या आस्थापनांची यादी करसंकलन विभागाकडून तयार करण्यात आली असून, संबंधित विभागीय कार्यालयास कारवाईसाठी पाठविण्यात आली आहे. याचबरोबर अशा मालमत्तांची यादी वर्तमानपत्रातून प्रसिध्द केली जाणार आहे.

    त्याचबरोबर अशा थकबाकीदारांना आवाहन करण्यासाठी सदर आस्थापनांच्या बाहेर बँड पथकाकडून बँड वाजविण्यात येणार आहे. याबरोबर सदर मालमत्तांवर चालू स्थितीमध्ये सुध्दा जप्ती करण्याचे आदेश करसंकलन विभागाकडून देण्यात आले असून शहरामध्ये मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येत आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *