- January 14, 2025
- No Comment
वाल्मीक कराडवर मोक्का मोक्काअंतर्गत कारवाई
बीड: जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाकडे राज्याचे लक्ष लागले असून याप्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी एक आरोपी वगळता सर्वच आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात येत आहे.
याप्रकरणात मास्टरमाईंड असल्याचा आरोप झालेल्या वाल्मिक कराडवर अद्यापही 302 अंतर्गत खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही. पण, सीआयडीकडून आज वाल्मिक कराडवर देखील मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, खंडणी प्रकरणात पोलीस कोठडी संपल्यानंतर वाल्मिक कराडला आज केज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. आता कराडवर मोक्का लावण्यात आला आहे.
मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने आता वाल्मिक कराडला जामीन मिळण्याची शक्यता कमी आहे. दरम्यान, यापूर्वी संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, कृष्णा आंधळे, विष्णू चाटे, सिद्धार्थ सोनावणे, महेश केदार आणि जयराम चाटे यांच्यावर मोकोका लावला आहे. मात्र, वाल्मिक कराडवर अद्यापही खुनाचा गुन्हा दाखल नाही. दरम्यान, मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने सत्र न्यायालयाकडून जामीन दिला जात नाही. मोक्काअंतर्गातील गुन्ह्यात विशेष न्यायालयाकडे जामीनासाठी अर्ज करावा लागतो. ते विशेष न्यायालय छत्रपती संभाजीनगर येथे आहे. त्यामुळे, मोक्का अंतर्गत जामिनासाठी संभाजीनगरच्या कोर्टात अर्ज करावा लागणार आहे.