• January 14, 2025
  • No Comment

बावधनमध्ये अनाधिकृतपणे हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

बावधनमध्ये अनाधिकृतपणे हुक्का पार्लरवर पोलिसांची कारवाई, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

बावधन (पिंपरी): बावधन परिसरातील एका पबमध्ये अनाधिकृतपणे हुक्का पार्लर सुरू असल्याची बाब उघडकीस आली. हुक्का पार्लरसाठी कोणतीही परवानगी न घेता ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी दिल्याने पोलिसांनी रविवारी (दि.१२) या पबवर कारवाई केली.

बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बारमध्ये सुरू असलेल्या हुक्का पार्लरवर बावधन पोलिसांनी कारवाई केली. यामध्ये ६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. सौम्यरंजन शिशिरकुमार बेहरा (२१, रा. वाकड), राहुल श्रीकांत कुलकर्णी (३७, रा. भुगाव, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. पोलिस अंमलदार दत्तात्रय शिंदे यांनी याप्रकरणी सोमवारी (दि. १३) बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधन पोलिस ठाण्याच्या हद्दीत म्हाळुंगे येथे बॉम्बे बिस्ट्रो रेस्ट्रो बारमध्ये हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती बावधन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारून कारवाई केली. हॉटेलमध्ये हुक्क्याचा वेगळा झोन न करता गिऱ्हाईकांची गर्दी करून त्यांना जेवणास व हुक्का पिण्यास एकत्र बसविल्याचे आढळले. हॉटेलमध्ये विनापरवाना बेकायदेशीरपणे हुक्का पार्लर सुरू होता. याबाबत पोलिसांनी कारवाई करत हॉटेलमधील कामगार सौम्यरंजन आणि व्यवस्थापक राहुल कुलकर्णी यांच्यावर गुन्हा दाखल केला. तसेच या कारवाईमध्ये सहा हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

Related post

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय तरूणाला १० वर्षे ‘सक्तमजुरी’

घरात घुसून ९ वर्षीय मुलीवर ‘लैंगिक अत्याचार’; १९ वर्षीय…

पुणे: बेकायदेशीरपणे घरात घुसून नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्याला १० वर्षे सक्तमजुरी आणि २० हजार रुपये दंडाची शिक्षा जिल्हा व…
महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

महापालिकेत नोकरी लावण्याच्या आमिषाने २१ लाखांची फसवणूक

पिंपरी: पिंपरी-चिंचवड महापालिकेत नोकरीला लावतो, असे आमिष दाखवून २१ लाख २० हजार रुपये घेतले. मात्र, नोकरीला न लावता तसेच रक्कम परत…
थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

थकबाकीदारांच्या १६ हजार २६५ मालमत्ता सील; महापालिकेकडून धडक कारवाई

पिंपरी: मार्च अखेर जवळ येत असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्याची कारवाई तीव्र केली आहे. आतापर्यंत तब्बल…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *