- January 15, 2025
- No Comment
पुण्यात चोरट्यांच थैमान, भरदिवसा फ्लॅट फोडला; लाखांचा ऐवज चोरला

पुणे: पुणे शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, भवानी पेठेत वर्दळीच्या ठिकाणी चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी करून रोख रक्कम व सोन्याचे दागिने असा दोन लाखाचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
त्यासोबतच शहरातील बंडगार्डन आणि कोंढवा परिसरात घरफोडीची प्रत्येकी एक घटना घडली आहे.
याप्रकरणी समर्थ संभाजी तरडे (वय २०, रा. गितांजली कॉम्प्लेक्स) या तरुणाने तक्रार दिली आहे. त्यावरून अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भवानी पेठेतील गितांजली कॉम्प्लेक्समध्ये रविवारी दुपारी पावणेचार ते साडेपाच या वेळेत घरफोडीची घटना घडली.
पोलिसांच्या माहितीनुसार, गितांजली कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर शिंदे रुग्णालय आहे. तक्रारदाराचे घर तिसऱ्या मजल्यावर आहे. रविवारी दुपारी तक्रारदार तरूण घरात नसताना अज्ञाताने त्याच्या घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून लाकडी कपाटातून रोकड व सोन्याचे दागिने असा दोन लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक प्रल्हाद डोंगळे अधिक तपास करीत आहेत.