• January 15, 2025
  • No Comment

दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड

दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड

लोणावळा: लोणावळा येथे दोन वर्षांच्या मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घरात खेळत असलेल्या दोन वर्षांच्या चिमुकलीचे अपरहण करण्याचा डाव आरोपीने केला होता.

मात्र, ही चिमुकली रडायला लागली अन् आरोपीने आखलेला अपहरणाचा डाव फसला. ही घटना रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. चिमुकलीचे अपहरण करणाऱ्या व्यक्तीला पकडून घरातल्या व्यक्तींनी चोप दिला. अमर त्रिपाठी असे पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास चिमुकली राहत असलेल्या घरात आरोपी शिरला आणि मुलीला घेऊन जाणार तितक्यात मुलीने मोठ मोठ्याने रडायला सुरूवात केली. मुलगी का रडत आहे? हे पाहण्यासाठी तिची आई बाहेर आली. त्यावेळी तिला घेऊन पसार होण्याच्या तयारीत तो होता. मात्र, घरातील व्यक्तींनी त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला. या प्रकरणी लोणावळा पोलिसांनी आरोपी अमर त्रिपाठी याला अटक केली आहे. या घटनेवर पालकांनी लहान मुलांवर लक्ष ठेवण्याची गरज आहे. सुदैवाने सदर घटनेत अपहरणाची घटना टळली आहे.

Related post

सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीचे मजरीमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत करणाऱ्या तहसीलदारासह ६ जणांना बेड्या

सरदार वाघोजी तुपे यांच्या समाधीचे मजरीमध्ये रूपांतर करण्यासाठी मदत…

पेण: इतिहासात असंख्य मावळ्यांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन स्वराज्याची स्थापना केली, त्यापैकी एक,नरवीर सरदार वाघोजी तुपे,नामदार खान हा अबझल खाणाचा मावसभाऊ…
इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट समितीवर वाळुंजकर यांची नियुक्ती 

इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट समितीवर वाळुंजकर यांची नियुक्ती 

पिंपरी: कौशल्य विकास, नाविन्यता व रोजगार विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेवरती मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या सूचनेनुसार सदस्यांची…
पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला साताऱ्यात ठोकल्या बेड्या

पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजाला साताऱ्यात…

पुणे: पुण्यात भर चौकात अश्लील चाळे करणाऱ्या गौरव अहुजा याला साताऱ्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. ८ मार्च रोजी सकाळी भर चौकात…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *