- January 15, 2025
- No Comment
घरगुती वादात 73 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या, भावाच्या पत्नीवर गुन्हा दाखल

पिंपरी: भावाच्या पत्नीच्या त्रासाला कंटाळून 73 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना सहा जानेवारी रोजी सायंकाळी दळवीनगर, चिंचवड येथे घडली.
रवींद्र त्रिंबक रुकारी (वय 73) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी रवींद्र यांचा मुलगा विशाल रुकारी (वय 44, रा. दळवी नगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार रवींद्र यांच्या भावाच्या पत्नीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवींद्र यांच्या भावाची पत्नी रवींद्र यांना कौटुंबिक कारणांवरून त्रास देत होती. त्या त्रासाला कंटाळून रवींद्र यांनी सहा जानेवारी रोजी टोकाचे पाऊल उचलत गळफास लावून आत्महत्या केली. आरोपी महिलेने रवींद्र यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. तसेच विशाल आणि त्यांचे वडील रवींद्र यांना धमकी दिली असल्याचे फिर्यादित नमूद केले आहे.
पुढील तपास चिंचवड पोलीस करीत आहेत.