• January 15, 2025
  • No Comment

एटीएम मशीन फोडायला गेलेला टोळका गजाआड, हडपसर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

एटीएम मशीन फोडायला गेलेला टोळका गजाआड, हडपसर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    हडपसर: पुण्यातील हडपसरमधील घुले वस्ती येथील एचडीएफसी बँकेच्या एटीएममध्ये पहाटे साडेचार वाजता शिरुन मशीनची तोडफोड करण्यास सुरुवात केली. मात्र, त्याचा अलर्ट मुंबईहून हडपसर पोलीस ठाणे आणि ११२ ला मिळाला.

    तातडीने पोलीस संबंधित एटीएम सेंटरमध्ये दाखल झाले आणि तोडफोड करणार्‍या चोरट्याला ताब्यात घेतले. हा प्रकार मांजरी येथील घुले वस्तीमधील एचडीएफसी बँकेच्या एटीएम सेंटरमध्ये सोमवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास घडला आहे.

    शंभू कुमार श्रीनगेंद्र सिंग महतो (वय २९, रा. गोपाळपट्टी, मांजरी बुद्रुक) असं या चोरट्याचे नाव आहे. याबाबत एटीएम सर्व्हिलन्स अधिकारी हर्षल सुरेंद्र सुतार (वय ३७, रा. आदर्शनगर, उरुळी देवाची) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांजरी येथील घुले वस्तीत एचडीएफसी बँकेचे एटीएम सेंटर आहे. हे सेंटर इंटरनेटद्वारे मुंबईतील सर्व्हरशी जोडले गेले आहे. त्याच्यावर २४ तास सीसीटीव्हीमार्फत नजर ठेवली जाते. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास शंभु महतो हा एटीएम सेंटरमध्ये शिरला. त्याने एटीएम मशीनमध्ये छेडछाड करण्यास सुरुवात केली. त्याबरोबर मुंबईतील सेंटरला या घटनेची माहिती मिळाली.

    त्यांनी एकाचवेळी ११२ आणि हडपसर पोलीस ठाण्याला याची माहिती दिली. शंंभु याने मशीनचे समोरील बॉक्स बाहेर काढला. त्याचे पैसे बाहेर येतात, ते काऊंटर तोडले, मशीन उघडण्याचा प्रयत्न करु लागला. मशीन फोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पोलीस त्या ठिकाणी दाखल झाले. पोलिसांनी शंभु महतो याला अटक केली असून पोलीस अंमलदार शिंदे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *