• January 15, 2025
  • No Comment

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून २९ लाखांना घातला गंडा, आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून २९ लाखांना घातला गंडा, आरोपीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल

    कोथरुड (पुणे): शेअर बाजारात गुंतवणुकीचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी कोथरूड परिसरातील एकाची २९ लाख ४० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ५३ वर्षीय व्यक्तीने कोथरूड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    त्यानुसार पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर चोरट्याने फिर्यादींच्या मोबाईलवर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्याने त्यांना दाखविले. फिर्यादींना व्हॉटस्अॅपमधील एका ग्रुपमध्ये सहभागी करून घेतले. परताव्याचे आमिष दाखवून त्याच्याकडून वेळोवेळी पैसे घेतले. फिर्यादीने चोरट्याच्या बँक खात्यात २९ लाख ४० हजार रुपये जमा केले. चोरट्याने त्याचा मोबाईल क्रमांक बंद केला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विक्रमसिंह कदम तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *