• January 15, 2025
  • No Comment

चक्क शाळेत चोरी, तीन लाख रुपये लंपास करून चोरटे पसार

चक्क शाळेत चोरी, तीन लाख रुपये लंपास करून चोरटे पसार

    पुणे: शहरातील एका नामवंत शाळेत चोरी झाल्याची घटना समोर आला आहे. पंडितरावर आगाशे शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडून चोरट्यांनी तीन लाख सतरा हजार रुपयांची रक्कम चोरुन नेल्याची घटना विधी महाविद्याल रस्त्यावर घडली आहे.

    याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध डेक्कन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे . याबाबत पंडितराव आगाशे शाळेतील एका शिक्षिकेेने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदाराने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विधी महाविद्यालय रस्त्यावर पंडितरावर आगाशे ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. रविवारीच्या दिवशी शाळेला सुट्टी असते हे चोरट्यांनी हेरून मध्यरात्री चोरटे शाळेच्या आवारात शिरले. चोरट्यांनी शाळेच्या कार्यालयाचे कुलूप तोडले. आणि कपाटात ठेवलेली तीन लाख सतरा हजार रुपये चोरून चोरटे पळता भुई झाले. दुसऱ्यादिवशी सोमवारी सकाळी शाळेचे कार्यालय उघडले असता पैसे चोरी झाल्याचे उघडकीस आले.

    सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी शाळेला भेट दिली. शाळेच्या परिसरात अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत. पुढील दिवसात शाळेकडून सहलीचे आयोजन केले जाणार होते. या सहलीसाठी विद्यार्थ्यांनी तीन लाख सतरा हजार रुपये कार्यालयातील कपाटात ठेवण्यात आले होते. अशी माहिती शाळेच्या शिक्षकांनी पोलिसांना दिली आहे. शाळेच्या कार्यालयाच्या आवारातील सीसीटीव्ही बंद असल्याचे आढळून आले आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *