“महाराष्ट्र क्राईम वॉचच्या” बातमीचा दणका काही तासातच स्वामी समर्थ मंदिरावर हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
- क्राईमदेशपुणे
- January 14, 2025
- No Comment
हडपसर: (ता. 13 ) सोमवार रोजी एक धक्कादायक घटना उघडकीस आली.
साडेसतरा नळी येथील जुन्या ग्रामपंचायतीच्या जवळ असलेल्या स्वामी समर्थ मंदिरावर तीन अज्ञात इसमांनी हल्ला केला होता. मंदिराची काच, परिसरातील झाडांचे नुकसान झाले आहे, स्वामी भक्त जमा झाल्याने हल्लेखोर पसार झाले होते. महाराष्ट्र क्राईम वॉच वृत्तपत्राने तशी बातमीही प्रकाशित केली होती. आणि काही तासातच स्वामी समर्थ मंदिरावर हल्लेखोराच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.