• January 15, 2025
  • No Comment

दोनशेहून अधिक अतिक्रमणांवर धडक कारवाई; तीन क्षेत्रीय कार्यालयांची संयुक्त मोहीम

दोनशेहून अधिक अतिक्रमणांवर धडक कारवाई; तीन क्षेत्रीय कार्यालयांची संयुक्त मोहीम

    पुणे: महानगरपालिका आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर नगर रस्ता परिसरातही अतिक्रमण कारवाईने जोर धरला आहे. परिमंडळ एक अंतर्गत असलेल्या तिन्ही क्षेत्रीय कार्यालयांनी मिळून कारवाईचा धडाका लावला आहे.

    सलग सुरू असलेल्या कारवाईत तीन दिवसात 200 हून अधिक अनाधिकृत व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली आहे.

    नगर रस्ता परिसरातील मंत्री मार्केट, खराडी बायपास येथील 102 अनाधिकृत इतक्या हातगाडी, स्टॉल, काउंटर, झोपड्या इत्यादी अनधिकृत व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आली.

    याच कारवाई अंतर्गत बुधवारी दुपारपर्यं खराडी आयटी पार्क परिसरातील गेरा बारकलेज समोरील 30 अनधिकृत व्यावसायिकांचे स्टॉल कारवाईत बांधकाम नियंत्रण विभागाकडून जेसीबी लावून तोडण्यात आले.

    बांधकाम नियंत्रण विभाग आणि अतिक्रमण विभागाचे रौद्ररूप पाहून अनधिकृत व्यावसायिक चांगलेच हादरले आहेत.

    या मोहिमेअंतर्गत ताडीवाला रस्ता ढोले, पाटील रस्ता, सौरभ हॉल परिसरातील 72 अनधिकृत हातखड्या, स्टॉल, काउंटर, झोपड्या, पथारी व्यवसायिकांवर कारवाई करण्यात आली.

    पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ एक येथील उपयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाचे कनिष्ठ अभियंता मंगेश गायकवाड, उमेश गोडगे आणि अतिक्रमण विभागाचे विभागीय अतिक्रमण निरीक्षक सुभाष तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगररस्ता क्षेत्रीय कार्यालय, येरवडा कळस धानोरी क्षेत्रीय कार्यालय आणि ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयातील अतिक्रमण विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही कारवाईची मोहीम राबवली

    Related post

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल असा धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या लेन्स कार्ड lenskart या कंपनीचा मनसे कडून जाहीर निषेध

    टिकली व टिळा धागा चालणार नाही पण हिजाब चालेल…

    लोणी काळभोर: लेन्स कार्ड हे विवाद मध्ये सापडले आहे. कंपनीचे सीईओ पियुष बंसल यांनी ग्रुमिंग गाईड असा एक स्टेटमेंट काढले आहे.…
    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी विजय; अध्यक्षपदी गोरख मेंगडे

    हमाल पंचायत निवडणुकीत एकनिष्ठ पॅनेलचा सर्व जागा जिंकत एकतर्फी…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्या निधनानंतर झालेल्या हमाल पंचायतच्या त्रैवार्षिक निवडणुकीत गोरख मेंगडे…
    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७ उमेदवार बिनविरोध, केळी विभागातील एका जागेकारिता मतदान.

    गुलटेकडी मार्केटयार्ड अडते असोसिएशन अध्यक्षपदी सौरभ कुंजीर बिनविरोध; १७…

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड अडते असोसिएशनच्या अध्यक्षपदी सौरभ कुंजीर यांची बिनविरोध निवड…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *