• January 15, 2025
  • No Comment

भरधाव वेगातील कार उलटून तरुणीचा मृत्यू; कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

भरधाव वेगातील कार उलटून तरुणीचा मृत्यू; कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

    पुणे: भरधाव वेगातील कार उलटून तरुणीचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर स्वामी नारायण मंदिराजवळ घडली. अपघातात कारमधील सात जण जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    विजया बाजीराव पडवळ (वय २९, रा. शेळू, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. अपघातात पवन कहाते, विजय आंबेकर, सचिन मंजाबापू, गायत्री मोहिते, सुप्रिया लाड, संदीप मराठे जखमी झाले आहेत. भरधाव कार चालवून अपघातास जबाबदार ठरल्याप्रकरणी कार चालक प्रसाद दिलीप ढोले (वय २५, रा. सावरदरी, ता खेड, जि. पुणे) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

    अपघातात कारचालक ढोले देखील जखमी झाला आहे. पाेलीस शिपाई प्रशांत चाटे यांनी याबाबत सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भरधाव वेगाने कार सोमवारी मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरुन निघाली होती. नऱ्हे परिसरातील स्वामी नारायण मंदिराजवळ भरधाव कारवरील चालकाचे नियंत्रण सुटले. कार उलटल्याने चालक प्रसाद याच्यासह कारमधील प्रवासी विजया, पवन, विजय, सचिन, गायत्री, सुप्रिया, संदीप गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमींना तातडीने खासगी रुग्णलयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान विजया यांचा मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक अक्षय पाटील तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *