• January 15, 2025
  • No Comment

चक्क झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या वेशात घरफोडी, आरोपी गजाआड, १ कोटींपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त

चक्क झोमॅटो डिलिव्हरी बॉयच्या वेशात घरफोडी, आरोपी गजाआड, १ कोटींपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त

    पुणे: झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे कपडे घालून उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये घरफोड्या करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीने आतापर्यंत तब्बल १४ घरफोड्या केल्याचे उघड झाले असून, त्यांच्याकडून १ कोटींपेक्षा जास्त किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

    अटक आरोपींची नावे:

    गणेश काठेवाडे (मुख्य आरोपी), सुरेश पवार, आणि अजय राजपूत अशी आरोपींची नावे आहेत. स्वारगेट पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी ३००० हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून या टोळीचा मागोवा घेतला. मुख्य आरोपी गणेश काठेवाडे याने झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे कपडे वापरून रेकी केली. स्वतःची ओळख लपवण्यासाठी त्याने केसांचा विग, टोपी आणि विविध प्रकारच्या जॅकेटचा वापर केला.

    जप्त मुद्देमाल:

    •८६ तोळे सोन्याचे दागिने

    •१५० हिरे

    •३.५ किलो चांदी

    •१ दुचाकी

    •२ पिस्तूल व ५ जिवंत राऊंड

    •घरफोडीसाठी वापरलेली साधने

    गणेश काठेवाडे हा जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांनी उच्चभ्रू सोसायट्यांमध्ये रेकी करून घरफोड्या केल्या. चोरी केलेला माल विकून त्याने गोवा आणि इतर ठिकाणी मौजमजा केली, तसेच काही पैसे शेअर मार्केटमध्ये गुंतवले.

    पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील म्हणाल्या, “गणेश काठेवाडे हा या गुन्ह्यातील मास्टरमाईंड असून, त्याच्यावर ५५ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता घरफोडीचा हा नवा प्रकार समोर आला.”

    ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज नांद्रे, सहायक पोलीस निरीक्षक, राहुल कोलंबिकर, पोलीस उप निरीक्षक रविंद्र कस्पटे, तसेच पोलीस अंमलदार संजय भापकर, श्रीधर पाटील, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे, सुधीर इंगळे, सचिन तनपुरे, शंकर संपते, सागर केकाण, सतिश कुंभार, रफिक नदाफ, राहुल तांबे, विक्रम सावंत, शरद गोरे, रमेश चव्हाण, उज्वला थोरात, पोर्णिमा गायकवाड, व पोलीस मित्र दिनेश परीहार यांनी केली आहे.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *