• January 15, 2025
  • No Comment

मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार असलेल्या येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक

मोक्का कारवाईनंतर दोन वर्ष पसार असलेल्या येनपूरे टोळीच्या म्होरक्याला बारामतीतून अटक

    पुणे: कात्रज, आंबेगाव भागात दहशत माजविणाऱ्या येनपूरे टोळीचा म्होरक्या पप्पू येनपूरे याला भारती विद्यापीठ पोलिसांनी बारामतीतून अटक केली. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) येनपूरे टोळीविरुद्ध कारवाई केली होती. मोक्का कारवाईनंतर तो गेले दोन वर्ष पोलिसांना गुंगारा देत होता.

    याप्रकरणी प्रवीण उर्फ पप्पू अनंता येनपूरे (वय ३०, रा. सच्चाईमातानगर, कात्रज) याला अटक करण्यात आली. येनपूरे याच्यासह साथीदारांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. दोन वर्षांपासून भारती विद्यापीठ पोलिसांनी येनपूरेसह साथीदारांविरुद्ध मोक्का कायद्यान्वये कारवाई केली होती. कारवाईनंतर येनपूरे पसार झाला होता. पोलिसांकडून त्याचा शोध घेण्यात येत होता. येनपूरे मोबाइल संच वापरत नव्हता, तसेच तो वास्तव्याचे ठिकाणही बदलायचा. त्यामुळे तांत्रिक तपासात त्याच्याविषयी फारशी माहिती मिळत नव्हती.

    भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी मंगेश पवार, महेश बारावकर, सचिन गाडे, अभिनय चौधरी त्याचा माग काढत होते.

    तपासात तो बारामतीतील नीरा वागस परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून येनपूरेला नीरा वागस परिसरातून ताब्यात घेतले. पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील, गुन्हे शाखेच्या निरीक्षक संगीता देवकाते, राहुलकुमार खिलारे, उपनिरीक्षक निलेश माेकाशी, महेश बारावकर, मंगेश पवार, सचिन गाडे, अभिनय चौधरी, सचिन चोरमोले, सागर बोरगे, चेतन गोरे यांनी ही कारवाई केली.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *