• January 15, 2025
  • No Comment

सहाजणांकडून तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते, एक गुप्ती जप्त, बावधन पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

सहाजणांकडून तीन पिस्तूल, पाच काडतुसे, सहा कोयते, एक गुप्ती जप्त, बावधन पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

    बावधन: बावधन पोलिसांनी चार वेगवेगळ्या कारवाया करत पाच जणांना अटक केली. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून तीन पिस्तूल, पाच जिवंत काडतुसे, सहा कोयते, एक गुप्ती अशी शस्त्रे जप्त केली आहेत.

    आदेश राम टेमकर (वय २४, रा. सुसगाव, पुणे), सुमित संजय करेकर (रा. लवळे, पुणे), गणेश उर्फ गुड्या अनिल पाटेकर (वय २३, रा. शिवणे, पुणे), केशव त्र्यंबक काळे (रा. बीड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

    पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ जानेवारी रोजी बावधन पोलिसांनी रात्र गस्तीदरम्यान एक कार ताब्यात घेतली. कार मधून एक पिस्तूल, एक काडतूस आणि गांजा जप्त करण्यात आला. याप्रकरणात केशव काळे याला अटक करण्यात आली.

    त्यानंतर १३ जानेवारी रोजी गस्त घालत असताना बावधन पोलिसांना काळ्या काचा असलेली एक कार पकडली. तिची झडती घेतली असता त्यामध्ये एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, चार कोयते आणि गुप्ती अशी शस्त्रे आढळून आली. याप्रकरणी सुमित करेकर याला अटक करण्यात आली.

    तिसऱ्या कारवाई मध्ये हरी पवार याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली आहे. सुमित आणि हरी यांनी त्यांच्याकडील पिस्तूल हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आदेश टेमकर यांच्याकडून आणले असल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी आदेश याला अटक केली.

    चौथ्या कारवाई मध्ये सुमित करेकर याचे तडीपार साथीदार गणेश पाटेकर आणि एक अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन कोयते जप्त केले आहेत. हे दोघेजण कोयते घेऊन दहशत पसरवताना आढळून आले.

    आरोपी आदेश टेमकर याच्यावर सात, सुमित करेकर याच्यावर एक, गणेश पाटेकर याच्यावर सहा, केशव काळे याच्यावर एक आणि अल्पवयीन मुलावर तीन गुन्हे दाखल आहेत.

    सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभुते, पोलीस निरीक्षक भास्कर कदम, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत महाले, पोलीस उपनिरीक्षक बंडू मारणे, पोलीस अंमलदार बापूसाहेब धुमाळ, फारूक मुल्ला, संजीव सावंत, विक्रम कुदळ, मनोज राठोड, अरुण नरळे, विक्रांत चव्हाण, तौसिफ़ मोहम्मद, दत्ता शिंदे, स्वप्नील कांबळे, संतोष बंडगर यांनी केली.

    Related post

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर गुंजाळ यास जिल्हा व सत्र न्यायालय यांच्याकडून अटकपूर्व जामीन मंजूर

    सराईत गुन्हेगार तडीपार आदेश झालेला आरोपी लाल्या उर्फ मयुर…

    पुणे :- येरवडा परिसरात दहशत माजवुन रात्रीच्या वेळेस बर्थ-डे केक भर चौकात सिंघम गाण्यावर कापला. सदररील बातमी प्रसिध्द झाल्यानंतर पोलीसांची कारवाई…
    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी त्याला मदत करणाऱ्या दलालाने केलेल्या १५ परवान्यांची चौकशी करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले.

    कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपीला बनावट पत्ता देऊन शस्त्र परवान्यासाठी…

    पुणे : कोथरूड गाेळीबार प्रकरणातील आरोपी नीलेश घायवळचा साथीदार अजय सरोदे याने बनावट पत्ता देऊन शस्त्र परवाना मिळविल्याचे उघडकीस आले. शस्त्र…
    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना

    पुणे: पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुनाकिब नासिर अन्सारी असे आरोपीचे नाव असून त्याला…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *