• January 15, 2025
  • No Comment

पुण्यात चोरट्यांच थैमान, महिलांना अडवून लाखों रुपयांचे दागिने केले लंपास

पुण्यात चोरट्यांच थैमान, महिलांना अडवून लाखों रुपयांचे दागिने केले लंपास

    पुणे: पुणे शहरात संक्रातीच्या सणदिवशी चोरट्यांनी शहरात अक्षरशः थैमान घातल्याचे विविध घटनांमधून समोर आले आहे. चोरट्यांनी दुचाकीवर येऊन महिलांकडील तीन लाखांचे दागिने चोरुले आहे. या घटना पुणे शहरातील धनकवडी, वानवडी या परिसरात घडल्याचे समोर आले आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, वानवडीमधील लष्करी रुग्णालयाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील एक लाख वीस हजारांचे मंगळसूत्र चोरून नेल्याची घटना घडली आहे. याबाबत एका महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही महिला वानवडी भागात वास्तव्यास आहे.

     

    मंगळवारी दुपारी पावणेबारा वाजेच्या सुमारास तक्रारदार महिला दुचाकीवरुन लष्करी रुग्णालयाच्या परिसरातून जात होत्या. त्यावेळी महिलेच्या दुचाकीला स्वतःची गाडी आडवी लावून अडवले. आणि महिलेच्या गळ्यातील एख लाख वीस हजार रुपयांचे मंगळसूत्र घेऊन चोरटे पसार झाले आहेत. पोलीस उपनिरीक्षक धनाजी टोणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    दुसरी घटना:

    धनकवडी: धनकवडी येथील दुसऱ्या घटनेत परिसरातील ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील एक लाख वीस हजार रुपयांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.

    याबाबत एका ज्येष्ठ महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार महिला धनकवडी भागातील चैतन्यनगर परिसरात राहायला आहे. मंगळवारी दुपारी त्या धनकवडीमधील त्रिमूर्ती चौकातून जात होत्या. दुचाकीस्वाराबरोबर असलेल्या साथीदाराने महिलेच्या गळ्यातील एक लाख बावीस हजार रुपयांचे मंगळसूत्र लंपास केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर पाटील या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

    Related post

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    पवना नगरातील हॉटेलमध्ये दादागिरी; कर्मचाऱ्यांना धमक्या देत मोबाईलवर शूटिंग

    लोणावळा;पवना नगर परिसरातील एका हॉटेलमध्ये नुकतीच धक्कादायक घटना घडली. एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह हॉटेलमध्ये आला होता. हॉटेल परिसरातील पाण्याच्या दिशेने जाणे…
    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये ग्राहकांची वर्दळ घटली; विक्रीअभावी भाजीपाला शिल्लक 

    प्रतिनिधी : सचिन गाडे पुणे : शहरातील प्रमुख भाजीपाला घाऊक बाजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये सध्या ग्राहकांची संख्या मोठ्या…
    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट 2 ची कारवाई

    स्वारगेट पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी जेरबंद; गुन्हे शाखा युनिट…

    पुणे: स्वारगेट पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील तडीपार आरोपी शाबीर महंमद शेख उर्फ शाहू (वय ३५, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, गुलटेकडी, पुणे) याला गुन्हे…

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *